Ajit Pawar News : 2019 साली शिवसेनेसोबत गेलो मग आता भाजपसोबत काय बिघडलं, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Ncp) कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अजित पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे.
राज्यात गुन्हेगारी वाढते! सुळेंच्या आरोपांवर फडणवीसांनी मविआ काळातलं सगळंच काढलं
अजित पवार म्हणाले, महायुतीमध्ये तीन पक्षाची विचारधारा जरी वेगवेगळी असली तरी पंतप्रधान मोदींच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष आहे. सर्वच समाजाला सोबत घेऊन जाणारा विचार राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांने 500 मतदार एकत्र केले पाहिजे, एकदिलाने काम केलं तरचं मुंबईत पक्ष वाढणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
लोकसभेला कोणत्या राज्यात किती जागा लढवायच्या? काँग्रेसचा गोपनीय अहवाल बाहेर! ‘इंडिया’त बिनसणार?
तसेच काही जण म्हणतात की, सत्तेसाठी सरकारमध्ये गेलो पण अजितबात सत्तेसाठी गेलेलो नाही. पुढं एक आणि मागे एक बोलायचं हा माझा स्वभाव नाही…काय असेल ते तोंडावर सांगणार मागे काही बोलणार नाही , आपल्या माणसांना फसवायचं हे माझं काम नाही, या शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना सुनावलं आहे.
शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा वेगळाच युक्तिवाद
2019 साली आम्हाला शिवसेनेसोबत जाण्यास सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आपण शिवेसनेच्या विरोधात होतो, तरीही आपणांस जाण्यास सांगितलं होतं. मग आता भाजपसोबत गेल्याने काय बिघडलं? कामे तर होत आहेतच ना… प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघाचे प्रश्न सुटत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र :
आगामी निवडणुकांसाठी आपल्याकडे आता वेळ कमी राहिला आहे. मुंबईतील प्रत्येक वार्डातील कार्यकर्त्यांना पद देताना परिसरातील त्यांची प्रतिमा चांगली पाहिजे, मग तो कार्यकर्ता कोणीही असो, कोणत्याही सेलचा असो, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला असला पाहिजे, बुथनूसार त्या कार्यकर्त्यांकडून नोंदी झाल्या पाहिजेत, सतत बैठका झाल्या पाहिजेत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांची दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पार पडणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सूचना असतील तर त्या तिथं मांडाव्यात. या बैठकीला मी स्वत; आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील आमदार उपस्थित राहणार आहे, त्यामुळे आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.