राष्ट्रवादीचा आता मुंबईवर फोकस; अजितदादांनी मेळाव्यात सांगितला प्लॅन

राष्ट्रवादीचा आता मुंबईवर फोकस; अजितदादांनी मेळाव्यात सांगितला प्लॅन

Ajit Pawar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. एकीकडे महायुतीचे तीन घटक पक्ष तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना मुंबईवर फोकस करण्याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या!

अजित पवार म्हणाले, मुंबईत आज 7 ते 8 हजार कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील ग्रामीण भागात सर्वदूर पसरली असून आता आपल्याला मुंबईकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी समीर भुजबळांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यकर्त्यांने मुंबईतील मतदारांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

आगामी निवडणुकांसाठी आपल्याकडे आता वेळ कमी राहिला आहे. मुंबईतील प्रत्येक वार्डातील कार्यकर्त्यांना पद देताना परिसरातील त्यांची प्रतिमा चांगली पाहिजे, मग तो कार्यकर्ता कोणीही असो, कोणत्याही सेलचा असो, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला असला पाहिजे, बुथनूसार त्या कार्यकर्त्यांकडून नोंदी झाल्या पाहिजेत, सतत बैठका झाल्या पाहिजेत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?

निवडीनंतर पदाधिकाऱ्यांची दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पार पडणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सूचना असतील तर त्या तिथं मांडाव्यात. या बैठकीला मी स्वत; आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील आमदार उपस्थित राहणार आहे, त्यामुळे आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सध्या मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आपण करत आहोत. देशातलं सर्वाधिक प्रदुषण असणारं मुंबई शहर आहे. इथल हवामान दुषित झालं असून त्यासाठी आता सिव्हरेज स्ट्रिटमेंट प्लांटमधून निघणाऱ्या पाण्यातून रस्ते धूणार आहोत. नाहीतर लोकं म्हणतील की इथं प्यायल पाणी नाही आणि हे लोकं रस्ते धूत आहेत. रशियात रस्ते धूत आहेत,तसेच मुंबईतही धुतले जाणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube