Devendra Fadnvis speak on maratha reservation : राज्यातील जातीय सामाजिक सलोखा राखणं ही समाजाची आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी असल्याचं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये रान पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी मराठा आणि ओबीसी समाजबांधवांसह राजकीय नेत्यांना आवाहन केलं आहे.
‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षण देण्याची कमिटमेंट आहे, त्यावर जी कार्यवाही करायची आहे ती आम्ही करत आहोत. या कारवाईला जेवढा कायदेशीर वेळ द्यावा लागेल तेवढा आम्ही देणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील; राऊतांनी सांगितलं मंत्रिमंडळातील इनसाईड गँगवॉर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाला सांगितला आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे. ही आमचीच नाही तर सर्वांची जबाबदारी असून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये ही जबाबदारी समाजाची आणि राजकीय नेत्यांची असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे रान पेटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान मराठा आरक्षणाविषयी भाष्य करणाऱ्या नेत्यांच्या घराला आक्रमक आंदोलकांकडून आग लावण्यात आल्याचंही दिसून आलं आहे. त्यावरुन ओबीसी नेते छगन भुजबळांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास प्रखर विरोध दर्शवला आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं असतानाच आता छगन भुजबळांनी केलेल्या विधानावरुन वादंग पेटलं आहे. आरक्षणासाठी दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. कुणबीच्या नोंदी असलेल्या ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आता सर्वच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.