Deepak Kesarkar On Ladki Bahin Yojana 2100 rs Installemnt : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहेत. या योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 रूपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी प्रचारावेळी दिले होते. त्यामुळे या योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 वरून 2100 रूपये केव्हा होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Maharashtra Goverment) आहे. आज महायुतीचा शपथविधी पार पडणार आहेत. निवडणुकीत या योजनेने महिलांवर चांगला प्रभाव पाडला. लाडक्या बहिणींचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजकीय विश्लेषकांनी देखील हीच भूमिका मांडली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा (Maharashtra Politics) 1500 दिले जात आहेत. निवडणुकीमुळे मात्र योजनेचे पैसे वितरित करण्यात आलेले नाहीत. तर निवडणुकीनंतर 1500 ऐवजी 2100 रूपये देवू, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराआधी दिलंय. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेच्या पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा लागलेली आहे. सर्व महिलांसमोर आता 2100 रूपये केव्हापासून मिळणार? हा प्रश्न आहे.
आम्हाला विश्वास … एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील ; उदय सामंत
शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यांसदर्भात महत्वाचं विधान केलंय. केसरकर म्हणाले की, आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या शपथविधीनंतर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट होईल. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एखादा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहेत. तर लाडकी बहिण योजनेसंदर्भात हप्त्याची रक्कम वाढवण्याबाबत चर्चा होईल. यासंदर्भात देखील निर्णय होवू शकतो. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी यामध्ये पूरक तरतूद केली जावू शकते, असे संकेत केसरकरांनी दिले आहेत.
आतापर्यंत राज्यातील दोन कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. सरकारकडून या योजनेचा लाभ गरजवंत महिलांना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अर्जदार महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जाईल, अशी शक्यता आहे. गरजवंत महिलांना अर्थसाहाय्य करताना प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या पार्श्वभूमीवर अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत निकषांची पू्र्तता न करणारे अर्ज योजनेतून बाद केले जाणार आहेत.