गृहमंत्रीपदावरुन रस्सीखेच! शपथविधा सोहळ्यापूर्वी गुलाबराव पाटलांचे मोठं विधान, ‘गृहखाते शिंदे साहेबांनाच…’
Gulabrao Patil : आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) होणार आहे. नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण त्यात एक ट्विस्ट आलाय. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गृहमंत्रीपदावर भाष्य केलं.
सस्पेन्स संपला! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
गृहखाते शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
नुकताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली. या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याने ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर गृहखाते शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी आहे. पण, तो अधिकार शिंदे साहेबांना आहे, तडजोड करणे हा त्यांचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.
Rashmika Mandana : रश्मिका मंदानाचा साडीतील लूकवर चाहते फिदा…
दरम्यान, राष्ट्रवादीच्या शपथविधी सोहळ्याची गुलाबी रंगाची पत्रिका व्हायरल झाली. पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. त्याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या त्यांचं नाव नाही, असे त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. राष्ट्रवादी आमचा एक एक घटक आहे. तीन पक्ष आहेत. नावाचा उल्लेख असायला हवा होता. पण, आता ती वेळ नाही. भविष्यात अशी चूक होऊ नये, असं त्यांनी पथ्य पाळावं, असं पाटील म्हणाले.
दुसरीकडे शिवसेनेने जारी केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही. या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाल्याने ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.