Download App

भाजपकडून निवडणुकीत गैरव्यवहार करण्याचा प्रत्यन, ‘आप’ने केला गंभीर आरोप

Delhi Mayoral Elections 2024 : दिल्लीत उद्या म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेवर दिल्ली सरकारचे मंत्री

  • Written By: Last Updated:

Delhi Mayoral Elections 2024 : दिल्लीत उद्या म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या (Delhi Mayoral Elections 2024) प्रक्रियेवर दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर (BJP) गंभीर आरोप केले आहे. त्यांनी दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकी चंदीगडप्रमाणे गैरव्यवहार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सौरभ भारद्वाज यांनी भाजपवर मोठा आरोप करत भाजप त्यांच्या नगरसेवकाला या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून निवडून आणण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आरोप त्यांनी केला.

या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत सौरभ भारद्वाज म्हणाले, नेहमी महापौर निवडणुकीत पीठासीन अधिकाऱ्याची भूमिका विद्यमान महापौर बजावतात मात्र या निवडणुकीत मुख्य सचिव ज्या प्रकारे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून निवडून आलेल्या सरकारला बाजूला ठेवून थेट एलजी कार्यालयात फाइल पाठवत आहेत. यामुळे या निवडणुकीत गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.

भाजपवर आरोप करत सौरभ भारद्वाज म्हणाले, पीठासीन अधिकारी निवडण्यासाठी आम्ही वारंवार पत्र देत आहे मात्र एलजी कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद येत नाही. उद्या निवडणूक होणार आहे, मात्र अद्याप पीठासीन अधिकारी निवडण्यात आलेले नाहीत, या लोकांना या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकाला पीठासीन अधिकारी करायचा आहे किंवा ही निवडणूक लांबवायची आहे असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

भाजपला चंदीगडची पुनरावृत्ती करायची आहे

आम आदमी पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ज्याप्रमाणे चंदीगड महापौरच्या निवडणुकीत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच फसवणुकीची पुनरावृत्ती सरकारला या निवडणुकीत करायची आहे. भाजप एमसीडीच्या महापौर निवडणुकीतही फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहे असं या निवेदनात म्हटले आहे.

अन् भरसभेत उत्कर्षा रुपवते यांना बाळासाहेबांचा आला फोन, म्हणाले…

2024 जानेवारी महिन्यात चंदीगड महापौर निवडणुकीत रिटर्निंग ऑफिसरने आठ मतांना अवैध ठरवले होते.मात्र या नंतर सर्वोच न्यायालयाने ही मते वैध ठरवून आप आणि काँग्रेसच्या संयुक्त उमेदवाराला निवडणुकीत विजयी घोषित केले होते.

follow us