‘निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागेल’; भाजपचा हल्लाबोल

‘निवडणुकीनंतर शरद पवारांना भिंग लावून शोधावं लागेल’; भाजपचा हल्लाबोल

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीमध्ये (Ahmednagar Loksabha) महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचा दावा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जात आहे. शरद पवारांच्या या दाव्यावर बोलताना भाजपकडून चांगलाच शाब्दिक टोला लगावण्यात आला आहे. यांना लोकांनी मत देऊन निवडून तर दिले पाहिजे निवडणुकीनंतर शरद पवार यांना भिंग लावून शोधावं लागणार असल्याचा शाब्दिक टोला भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी (Laxman Sawaji) यांनी लगावला आहे.

‘गंगेतून मथुराकरांना पेयजल’म्हणणाऱ्या हेमा मालिनीला तोंडावर पाडलं; ट्रोलर्सनी सुनावलंच!

लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय पक्षांकडून आपापले जाहीरनामे देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता या जाहीरनाम्यावरून टीका-टिपणी देखील होऊ लागली आहे. नगर दक्षिणेमध्ये देखील लोकसभेवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

लंकेंच्या प्रचारसभेत दत्ता देशमुखांची आठवण काढत पवारांनी निळवंडे धरणाचा सांगितला ‘तो’ किस्सा

यावेळी बोलताना लक्ष्मण सावजी यांनी शरद पवारांसह काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, धर्माच्या आधारावर ही निवडणूक लढवत नाही तर आम्ही केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवत आहोत. काँग्रेस गेल्या अनेक वर्ष सत्तेत होती मात्र त्यांनी विकास कामांकडे दुर्लक्ष केले. आज आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठल्या ना कुठल्या कारणास्तव पैसे जमा केले जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे, असे देखील सावजी
यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके तर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात चुरशीची फाईट होणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे. अशातच निलेश लंकेंच्या विजायासाठी शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये आत्तापर्यंत दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. या जाहीर सभांमधून शरद पवार यांनी भाजपसह विखे कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube