अहमदनगरवर भाजपचा ‘फोकस’; जुन्या शिलेदारांवर लोकसभा, विधानसभेची जबाब
Ahmednagar : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. आता भाजपने (Bjp) एकाचवेळी लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करत निवडणुक प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभेचे निवडणूक प्रमुख नेमताना भाजपने आपल्या जुन्या शिलेदारांवरच मोठी जबाबदारी दिली आहे. ( bjp-head-loksabha-and-assembly-election-ahmednagar)
BJP Election Chiefs : पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी राहुल कुल तर; पुण्यासाठी मोहोळ मैदानात
अहमदनगर लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिर्डी लोकसभेची जबाबदारी राजेंद्र गोंदकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. २०१८ मध्ये महानगरपालिकेत शिवसेना व भाजपचे बहुमत होते. शिवसेनेचा महापौर होईल, असे निश्चित होते. परंतु एेनवेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने वाकळे हे महापौर झाले होते. नगरमध्ये राष्ट्रवादी व भाजप एकत्र येणे राज्यभर गाजले होते. वाकळे हे भाजपचे जुने शिलेदार आहेत. त्यांच्यावर अहमदनगर लोकसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
भाजपचे 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर; या यादीतच दडलेत उमेदवार
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी उत्तरेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्याकडे देण्यात आली आहे. गोंदकर हे भाजपचे जुने नेते आहे. २०१४ मध्ये ते राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात विधानसभा लढले होते.
याचबरोबर जिल्ह्यातील बारा विधानसभेसाठी निवडणूक प्रमुख नेमण्यात आले आहे. अहमदनगर विधानसभेची जबाबदारी ही शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यावर देण्यात आलेली आहे. नगर शहरातील दोन भाजप नेत्यांवर दोन जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपने नगर विधानसभेवर फोकस केले असल्याचे दिसून येत आहे.
अकोल्याची जबाबदारी माजी आमदार वैभव पिचड, संगमनेरची सतीश कानवडे, शिर्डीची अॅड. रघुनाथ बोठे, कोपरगावची स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूरची नितीन दिनकर, नेवाशाची बाळासाहेब मुरकुटे, शेवगावची नारायण पालवे, राहुरीची शिवाजी कर्डिले, पारनेरची विश्वनाथ कोरडे, अहमदनगरची भैय्या गंधे, श्रीगोंद्याची बाळासाहेब महाडिक, कर्जत-जामखेडची राम शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. यातील अनेक जण हे विधानसभेच्या उमेदवार असणार आहेत.