अहमदनगर : राष्ट्रवादी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी; भाजप नगरसेवकासह पाच जणांना अटक

  • Written By: Published:
अहमदनगर : राष्ट्रवादी कार्यकर्त्याची मृत्यूशी झुंज अपयशी; भाजप नगरसेवकासह पाच जणांना अटक

Ahmednagar Criem News : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांचं आज (17 जुलै) पहाटे निधन झालं. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर चत्तर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक येथे अंकुश चत्तर यांच्यावर शनिवारी (ता. १५) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला होता. काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात चत्तर गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ( The fight with death was unsuccessful! Ahmednagar That NCP worker finally died, five people including a BJP corporator were arrested)

विरोधी पक्षनेतेपदासाठी संग्राम थोपटेंनी थोपटले दंड; थेट दिल्लीत लावली फिल्डिंग

दरम्यान या हत्याकांड प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह अभिजित बुलाख, सुरज कांबळे, बिभ्या कांबळे, महेश कुर्‍हे, राजू फुलारी या मुख्य आरोपींना विदर्भातून ताब्यात घेतले. तसेच (रविवारी) आणखी चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर व तांत्रिक पुराव्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube