Download App

A,B वा Z वोटर सर्व्हे असो हवा मोदींचीच; सी वोटर सर्व्हेवर फडणवीसांचं उत्तर

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी एबीपी आणि सी वोटरच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या सर्व्हेला बाजूला सारत देशात फक्त मोदींचीच हवा आहे असं म्हटलं. फडणवीस हे पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते बोलत होते.

A,B वा Z वोटर सर्व्हे असो हवा मोदींचीच…

पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला होता की, एबीपी आणि सी वोटर यांच्या एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे की, महाविकास आघाडीला राज्यात 26 ते 28 जागा मिळणार आहेत. तर भाजपच्या जागा कमी होणार आहेत. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले की, मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो. मात्र ए बी सी किंवा झेड सर्व्हे कोणताही असो. देशात फक्त मोदींचीच हवा आहे. जनतेने मोदी यांनाच मतदान करायचं ठरवलं आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यात महायुती लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकणार असणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

काय आहे हा सर्व्हे?

सी व्होटरच्या सर्व्हेत लोकसभा निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. इथं उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीचे भाग आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एनडीएचे घटक आहेत.

“महागाईचा भडका उडणार?” हूथी बंडखोरांमुळे भरली जगाला धडकी

लोकसभेच्या निवडणुकीत इंडियाच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळणार आहेत. महाविकास आघाडी 26 ते 28 जागा जिंकेल, असं सी व्होटरच्या सर्वेत दिसून आलं. तर भाजपला 19-21 जागा मिळू शकतात. इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.त्याचवेळी मतांच्या प्रमाणातही महाविकास आघाडीला 41 टक्के तर भाजप 37 टक्के मते मिळू शकतात. 22 टक्के मते इतर पक्षांकडे जाताना दिसत आहेत.

Shirur Loksabha : अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवारांचा शिलेदार ठरला…

सी वोटर सर्व्हे –
कोणत्या पक्षाला किती मते?
एनडीए – 37%
महाविकास आघाडी – 41%
इतर – 22%

कोणासाठी किती जागा?
एनडीए – 19-21
महाविकास आघाडी – 26-28
इतर- 0-2

Tags

follow us