शिंदे, अजितदादा यांना सोबत घेऊनही भाजपला तोटाच ! मतदार चाचणी कल टेन्शन वाढवणारा
Lok Sabha Election 2024 : आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या नेतृत्वात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि NDA आघाडी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही आघाडीत जागावाटपाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. मात्र, ही लढत अत्यंत रंजक असणार आहे. दरम्यान, या आजघडीला लोकसभा निवडणुका झाल्यास राज्यात काय परिस्थिती असेल, याबाबत सी व्होटरने (C voter survay) एक सर्वेक्षण केले आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटना बनवणार कुस्ती महासंघ चालविण्यासाठी खास पॅनेल; क्रीडा मंत्रायलयाची माहिती
लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसे वेगवेगळ्या संस्थाकडून जनतेला कौल जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रातही असेच सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. हे सर्वेक्षण महाविकास आघाडील दिलासा देणारे ठरले आहे.
नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपन कॉंग्रेसचा चांगलचं पराभव केला. त्यामुळं महाराष्ट्रातही मोदी लाट कायम राहील, असं बोलल्या जातं आहे. मात्र, सी व्होटरच्या सर्वेत लोकसभा निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात मोठा फटका बसणार आहे.
मी साठीनंतर निर्णय घेतलाय, तुम्ही तर चाळीशीच्या आत…अजितदादांचा शरद पवारांना टोला
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. इथं उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीचे भाग आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एनडीएचे घटक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत इंडियाच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळणार आहेत. महाविकास आघाडी 26 ते 28 जागा जिंकेल, असं सी व्होटरच्या सर्वेत दिसून आलं. तर भाजपला 19-21 जागा मिळू शकतात. इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
त्याचवेळी मतांच्या प्रमाणातही महाविकास आघाडीला 41 टक्के तर भाजप 37 टक्के मते मिळू शकतात. 22 टक्के मते इतर पक्षांकडे जाताना दिसत आहेत.
सी वोटर सर्वे –
कोणत्या पक्षाला किती मते?एनडीए – 37%
महाविकास आघाडी – 41%
इतर – 22%
कोणासाठी किती जागा?
एनडीए – 19-21
महाविकास आघाडी – 26-28
इतर- 0-२
लोकांच्या मनात फक्त मोदीच-राम कदम
या सर्व्हेवर भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंकडे नेतेच राहिलेले नाहीत. खासदार व आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत.उद्धव ठाकरेंचा पक्ष आता खूप छोटा झाला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना दोन आकडे जागाही मिळणार नाहीत. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल, असा ओपिनियन पोल होता. त्याचे काय झाले, असे कदम म्हणाले.लोकांच्या मनात फक्त भाजप आणि मोदी हेच आहेत. विमानतळे, रेल्वेचा विकास आम्ही केला असल्याचे राम कदम म्हणाले.
जनता उद्धव ठाकरेंबरोबर
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, नेते सोडून जात असले तरी जनता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्याचा आम्हाला फायदा होणार आहे.ईडी, सीबीआयमुळे काही जण तिकडे गेल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.