Download App

…म्हणूनच शिवसेना अन् राष्ट्रवादी फुटली; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं खरं कारण

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट का पडली? याबाबतच खरं कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Image Credit: Letsupp

Devendra Fadnvis News : मागील एक-दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कोसळून राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुट पडली. दोन्ही पक्षात नेमकी का फुट पडलीयं. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट भाष्य केलं आहे.

भाजपने दावा सोडला, नाशिकच्या जागेबद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

राज्यात सरकार पाडण्याची सुरुवातच कोणापासून झाली आहे? वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये असतानाच त्यांचं सरकार कोणी पाडलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांचा पक्ष फोडून दु:ख देण्याचं काम कोणी केलं. हे सर्वांनाचा माहीत असून आता खोके, ओके, तोडले-फोडले या घोषणांचा काही परिणाम होणार नसून अहंकार आणि अतिमहत्वकांक्षेमुळेच दोन पक्ष विभाजित झाले असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली

ठाकरेंना अहंकार अन् मुख्यमंत्रिपदाची लालसा…
उद्धव ठाकरेंना अहंकार होताच सोबतच मुख्यमंत्रिपदाचीही त्यांना लालसा होती. त्यांना जर शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायंच असतं तर ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु शकत होते, पण त्यांना शिवसैनिकांना मुख्यमंत्री नव्हतं. स्वत:लाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार बासनात गुंडाळून सरकार स्थापन केले. हीच अतिमहत्वकांक्षा पक्ष विभाजित होण्यासाठी कारणीभूत ठरली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Salaar 2: प्रभासच्या ‘सालार’ सिक्वेलमध्ये कियारा अडवाणी दिसणार का? दिग्दर्शकांनी थेट सांगितलं

ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे पंख छाटले…
माझ्यानंतर माझा मुलगा असा विचार उद्धव ठाकरे यांच्या मनात आला होता. मुलासाठी एकनाथ शिंदे अडसर ठरु नये म्हणून त्यांचे पंख छाटण्यात सुरुवात झाली होती. मंत्रालयात त्यांना न बोलावता आदित्य ठाकरेच बैठका घेत असतं. शेवटी एकनाथ शिंदेंना समजलं की आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळेच शिवसेनेचं विभाजन झालं असल्याचं कारण फडणवीसांनी सांगितलं आहे.

follow us

वेब स्टोरीज