Download App

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनुभाऊ काय बोलून गेले; माझ्या एका डोळ्यातील आश्रू पंकजांसाठी नव्हे तर…

Dhananjay Munde : बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : बीड लोकसभा निवडणुकीत (Beed Lok Sabha Election) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे काय (Dhananjay Munde) बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.

या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता मात्र तरीही देखील अजित दादांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला विधानपरिषदेच्या विरोध पक्ष नेतेपदी संधी दिली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा अजित पवारांनी ⁠कोणाच्या सांगण्यावरुन दिला होता हे आता आता सांगायची गरज नाही.

मी 2014 ते 2019 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र तीन वेळा पालथा घातला आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आणि त्यांना आपण पुन्हा सत्तेत येऊ शकतो असा विश्वास दिला होता. मी आज दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, विधासभेलाच नव्हे तर तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका असो वा नगरपरिषद, जोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी-पडशाचा तुम्हाला त्रास होणार नाही.

मी तुम्हाला सांगतो, अगदी जिल्हा परिषद निवडणूक असली तरी मी थांबणार नाही. ⁠जर कोणत्या सहकाऱ्याच्या नाकाला धार लागली तरी रुमाल घेऊन मी असेन असं धनंजय मुंडे म्हणाले.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या मनात आणि माझ्या मनात वेगळ्या भावना असू शकतात. लोकसभा निवडणुकीत आपण चार जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी 3 जागा निश्चित निवडनू येणार याची खात्री होती मात्र एक जगा जिंकता आली. पण दादा तुम्ही बारामतीची जागा हरलो याचं फार दुःख करु नका कारण ज्या परिस्थितीतून तुम्ही गेले त्याच परिस्थितून मी सुद्धा गेलो. ज्यावेळी आपण असा परिस्थितून जातो तेव्हा आपण कितीही विकास कामे केली असेल तरीही सहानभूती भारी पडते म्हणून आपण बारामतीमध्ये हरलो, त्यामुळे याच शल्य पूर्णपणे विधानसभेला भरुन काढू असं धनंजय मुंडे म्हणाले.

Bigg Boss OTT 3 मध्ये अनिल कपूरची एंट्री! धमाकेदार प्रोमो आउट

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. आपण केलेल्या विकास कामांचा प्रचार सोशल मीडियावर झाला पाहिजे याच बरोबर आपल्या कामाचा प्रचार प्रत्येक घरात पोहचावा लागेल असं धनंजय मुंडे या कार्यक्रमात म्हणाले.

धक्कादायक! अभिनेत्री नूर मलाबिका दासचा मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

follow us