Download App

मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस, 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

  • Written By: Last Updated:

मुंबई : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवा (Rohit Pawar) यांना ईडीची (ED) नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस, 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. काहीच दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. ईडीने पुणे, बारामती आदी ठिकाणी छापे टाकले होते. ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी छापे टाकले. यासोबतच आयकर विभागाने रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखान्यावरही छापा टाकला होता. मात्र तेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. मात्र, आज ईडीने रोहित पवारांना समन्स पाठवले असून त्यांना चौकशीसाठी 22 तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही नोटीस बजावली आहे.

रशियाच्या सीमेवर नाटोच्या तोफा अन् सैन्य; युक्रेनच्या मित्र देशांचं नक्की प्लॅनिंग काय? 

रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता. बारामती अ‍ॅग्रो कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले होते. बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट रद्द करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. त्याविरोधात रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून रोहित पवारची बारामती अ‍ॅग्रो कंपनी चर्चेत होती.

रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. मात्र, रोहित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत. त्यामुळं त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याचं बोलल्या जातं.

दरम्यान, मी ज्या प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत आहे, त्यामुळे केंद्रीय यंत्रणा माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. त्यामुळे आता या सर्व घडामोडीवर रोहित पवार काय भूमिका घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

follow us