Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse >) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा आहे. त्यांच्याबद्दल एवढं काय बोलता?
तसेच पुढे महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे आता कुठे राहिले आहेत? त्यांच्या गावातील सात लोकांची ग्रामपंचायत देखील त्यांच्याकडे राहिली नाही. ते दूध डेअरीचे चेअरमन होते. ते देखील पद त्यांच्याकडे नाही. जळगावमध्ये त्यांच्या पत्नीचा सुद्धा पराभव झाला. तर आमदारकीमध्ये त्यांची मुलगी ही पडली. त्यांच्याकडे बँक होती. ती देखील राहिली नाही. त्यांच्याकडे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना केंद्रात घेतील का? राज्यात संधी देतील का? या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा आहे. त्यांच्याबद्दल एवढं काय बोलता? असं म्हणत महाजनांनी खडसेंना डिवचलं आहे.
…तर असं पावरफुल शिलाजीत देऊ की, बस्स; मिश्किल टीपण्णी करत Nitin Gadkari मुनगंटीवारांसाठी मैदानात
दरम्यान दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन मी भाजपात प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची (JP Nadda) भेट घेतली. भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत हा पक्षप्रवेश व्हावा यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे, असे पत्रकारांनी विचारल्यावर खडसे म्हणाले, चंद्रपुरातील सभेत माझा पक्ष प्रवेश होणार नाही. माझा भाजप प्रवेश हा दिल्लीत होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून ज्या दिवशी मला बोलावण्यात येईल त्यादिवशी दिल्लीतच माझा प्रवेश होईल.