भाजप तालुकाध्यक्षाच्या पुतण्याकडून प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण; सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल
Prakash Solanke personal assistant beating : मराठा आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या पुतण्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीमध्ये आमची नाव विनाकारण का ओवली? हा जाब विचारत ही मारहाण करण्यात आली.
…तर असं पावरफुल शिलाजीत देऊ की, बस्स; मिश्किल टीपण्णी करत Nitin Gadkari मुनगंटीवारांसाठी मैदानात
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक महादू सोळंके यांना माजलगाव शहरातील रंगोली कॉर्नरवर भर चौकात अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये महादू सोळंके हे सलूनमध्ये शेविंग करत होते. त्यावेळी या तरूणांनी त्यांना मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीमध्ये आमची नाव विनाकारण का ओवली? हा जाब विचारत दुकानातून बाहेर ओढत आणत मारहाण केली.
पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता, 3 दिवसांपासून शोध सुरू, कंपनी माहिती देईना
त्यानंतर पोलिसांनी या मारहाण करणाऱ्या तरूणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांकडून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपच्या तालुकाध्यक्ष अरूण राऊत यांचा पुतण्या अजय सिंह राऊत, अभय राऊत, अशोक सोळंके, मेघराज सोळंके यांच्यासह आणखी तिघांवर गुन्हा दाखलं करण्यात आला आहे. तसेच या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.