पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता, 3 दिवसांपासून शोध सुरू, कंपनी माहिती देईना

पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता, 3 दिवसांपासून शोध सुरू, कंपनी माहिती देईना

Pranav Karad Missing : पुण्यातील (Pune News) प्रणव कराड (Pranav Karad) नावाचा तरुण अमेरिकेतू बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर कॅडेट म्हणून काम करत होता. शुक्रवारी अचानक त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाला. तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय खूपच चिंतेत आहेत.

दुध उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा! नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटीचं अनुदान 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव काही दिवसांपूर्वी अमेरिकेला गेला होता. तो अमेरिकेत तो विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कवर काम करायचा. मात्र तो ५ एप्रिलपासून अमेरिकेतून बेपत्ता आहे. तुमचा मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याचे कंपनीने कळवलं होतं. मात्र, त्यानंतर कंपनीने कोणतीही माहिती दिली नसल्याने मुलाचे काळजीत आहेत.

नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! आनंदराज आंबेडकर पुन्हा लोकसभेच्या रिंगणात 

प्रणव गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याचे वडिल गोपाळ कराड यांनी सांगितले आहे. मुंबईतील कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे.

प्रणव बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असेही त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.

काय म्हणाले प्रणवचे वडील?

मला माझा मुलगा परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही. याबाबत मी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. आमचं शोधकाम सुरू आहे, असं कंपनी सांगत आहे. पोलिसांकडूनही हवी तशी मदत मिळत नाही, याबाबबच कराड यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

विल्हेल्ममन शिप मॅनेजमेंट कंपनीने प्रणवचे सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube