Download App

आम्ही घासून नाहीं तर ठासून आलो, तुम्ही भेंडी बाजार शोधा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना ठणकावले

Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंवर लोकसभा निवडणुकीवरून हल्लाबोल केला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

Image Credit: Letsupp

Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray at Shivsena Anniversary : आम्ही घासून नाहीं तर ठासून आलो. तुम्ही मात्र कॉंग्रेसच्या वोट बॅंकेवर निवडून आले आहात. आता तुम्हाला तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदार संघ शोधावा लागेल. असं म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) लोकसभा निवडणुकीवरून हल्लाबोल केला. ते आज (19 जून) मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या (Shivsena Anniversary) कार्यक्रमामध्ये बोलत होते.

मिंदेला बाजूला ठेवा अन्… भरसभेत उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक जन म्हणत होते की, आम्ही घासून-पूसून निवडून येऊ. राजकीय पंडित काय सांगत होते की, आमची एक दोन जागा येईल. मात्र आम्ही घासून नाहीं तर ठासून आलो. तसेच उबाठाचे आता निवडून आलेले उमेदवार हे शिवसेनेच्या पारंपारिक मतदारांमुळे आलेले नाहीत तर ते कॉंग्रेसच्या वोट बॅंकेवर निवडून आले आहेत. त्यामुळे ही तात्पुरती आलेली सूज आहे. ती लवकरच ओसरेल. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

जिथे मंदिर बांधलं, तिथे रामाने मोदींना लाथाडलं; राऊतांची मोदींवर घणाघाती टीका

तसेच ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे संपणार अस काहीं जण बरळत होते. पण ह्या राज्यातील लोकांनी त्यांचे दात घशात घातले आहे. अरे हा एकनाथ शिंदे हा बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा चेला आहे. जे नको नको ते धाडस ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं. अरे ठाणे हे शिवसेनाचां बालेकिल्ला आहे. श्रीकांत जेव्हा पहिल्यांदा उमेदवार होता. तेव्हा त्याला कोणी ओळखत नव्हते.उबाठा आणि शिवसेना क्या १३ जागा होत्या त्या पैकी ७ जागा शिवसेनेच्या आल्या आहेत. कोण जिंकलं आणि कोण हारल हे स्पष्ट आहे.

तसेच 9 जिंकलेल्या उबाठाला ईद साजरी करावी लागेल. ज्या काँग्रेसला मतदान करणारे हे अभिमानाने सांगतात. बाळासाहेब यांना किती वेदना होत असतील. या वरळीमध्ये ऊबाठाने केवळ 6000 हजारचं लीड घेतला आहे. तेथे त्यांनी 50 हजारांचा दावा केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत तुम्हाला वरळी नाही. तर तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदार संघ शोधावा लागेल. तसेच रविंद्र वायकर याचा विजय हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

follow us

वेब स्टोरीज