Download App

मोठी बातमी : अखेर एकनाथ शिंदेंनी हट्ट पूर्ण केलाच; नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

  • Written By: Last Updated:

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून कुणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून, एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांचा हट्ट पूर्ण करत नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकच्या जागेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांनीही दावा केला होता. त्यानंतर आता अखेर गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला तिढा सोडवण्यात यश आले आहे. शिंदेसेनेत असलेले हेमंत गोडसे 2014 पासून नाशिकचे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार अशीच चर्चा होती आता त्यांच्या नावाची घोषणा झाल्याने गोडसेंची थेट लढत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. (Eknath Shinde Nominates Hemant Godse Name For Nashik Loksabha Seat)

अजितदादा पुन्हा दैवत बदलतील; राऊतांनी भाकित करत सांगितलं वर्ष अन् कारण

शिंदेंनी दक्षिण मुंबई, कल्याण आणि ठाणेही मिळवलं 

नाशिकच्या जागेशिवाय एकनाथ शिंदेंनी दक्षिण मुंबईतून शिवसेनेचा उमेदवारी जाहीर केला आहे. याशिवाय शिंंदेंनी महायुतीत ठाणे, कल्याण दक्षिण मुंबई आणि आता नाशिकची जागा स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक, ठाण्याचे उमेदवार जाहीर झालेले नव्हते. त्यामुळे या ठिकाणांवर नेमकी कुणाला उमेदवारी जाहीर होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काल (दि.30) दिवसभर मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकांचा धडाका लावला होता. त्यानंतर आता अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

ठाण्यातून नरेश मस्के तरस कल्याणमधून श्रीकांत शिंदे मैदानात 

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरून महायुतीत खलबतं सुरू होते. मात्र, अखेर या जागांचा तिढा सोडवण्यात यश आले असून, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता शिंदेंकडून ठाणे आणि कल्याणमधून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत.

छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?

गोडसेंचा जोरदार प्रचार करणार 

नाशिकमधून गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दिंडोरीच्या उमेदवार आणि नाशिकचे उमेदवार गोडसे यांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम उद्या होणार असून, फडणवीस आणि अन्य नेतेदेखील या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतील असे भुजबळ म्हणाले. उद्यापासून गोडसेंच्या प्रचाराला सुरूवात होईल असेही भुजबळांनी स्पष्ट केले. हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार असून, संपूर्ण नाशिक शहर त्यांना ओळखते. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सोप जाणार आहे.

follow us