Download App

‘राज-उद्धव’ भेटीवर DCM एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘ते दोघे एकत्र…’

मला वाटत नाही की, हे दोन भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. आत्ता तरी अशी स्थिती नाही, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एका लग्नसमारंभात आज एकत्र दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही. मात्र राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात असलेले हे दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. यावर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे.

एलआयसीकडे 881 कोटी रुपये धुळखात, अद्याप कोणीच केला नाही दावा, ते तुमचे तर पैसे नाहीत ना? 

मला वाटत नाही की, हे दोन भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. आत्ता तरी अशी स्थिती नाही, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचे आज लग्न आहे. दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात हा विवाह पार पडला. या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र दिसले. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र उभे राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची लग्नात भेट झाली, म्हणून राजकीय वातावरण तापण्याचं काही कारण नाही. जर तसं काही करायचं असतं तर राज ठाकरे यांनी विधानसभेच्या वेळी केलं असतं. राज ठाकरेंनी अनेकवेळा टाळी द्यायचा प्रयत्न केा. पण, उद्धव ठाकरेंनी हात कायमच मागे घेतला. मला वाटत नाही की, हे दोन भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. आत्ता तरी एकत्र येण्याची स्थिती नाही, असं शिरसाट म्हणाले.

PM Modi यांना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ पुरस्कार प्रदान 

दरम्यान, मंत्रिपदाविषयी बोलतांना ते म्हणाले की, मंत्रिपद मिळाल्याचा मला आनंद आहे. एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही कॉमन मॅन अशी आहे. त्यानुसारच आम्हा सर्वांच काम करण्याचं ध्येय आहे. माझ्याकडे सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्यात अनेक आव्हाने आहेत आणि मी ती पेलण्याचा प्रयत्न करेन. आता आमचे दौरेही सुरू होतील. सोमवारी उदय सामंत आणि मी बीडमधील मस्साजोगला जाणार आहोत. तसंच आम्ही परभणीचाही दौरा करणार आहोत. मराठवाड्यातील ज्या ठिकाणी घटना घडल्या, त्या ठिकाणी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहोत. वाढती गुन्हेगारी कशी थांबवता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.

 

follow us