Election Commission Notice To BJP And Congress : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. निवडणूक आयोगाने भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) पक्षाच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते आपण जाणून घेवू या. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले होते. सार्वजनिक शिष्टाचाराचं उल्लंघन होवू नये म्हणून आचारसंहितेचे पालन करण्यास सांगितले (Election Commission) होते. परंतु हे नियम पाळले न गेल्यामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडे उत्तर मागितलं आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने आज भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना स्वतंत्र पत्र लिहून प्रत्येकाला या तक्रारीवर प्रतिक्रिया देण्यास सांगितले आहे. आयोगाने दोन्ही पक्षांमधील तक्रारींची देवाणघेवाण करून त्यांचे उत्तर मागितलं आहे.
निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडून उत्तर मागितलं आहे. दोन्ही पक्ष प्रमुखांना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भातील तक्रारींबाबत निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय. आयोगाने भाजप अन् कॉंग्रेस अध्यक्षांना यासंदर्भात पत्र लिहिलंय.
मोनिका राजळेंची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी मदत करा, पंकजा मुंडेंचे आवाहन
निवडणूक आयोगाने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांना मागील सल्लागाराची आठवण करून दिलीय. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना स्टार प्रचारक आणि नेत्यांना नियंत्रणामध्ये ठेवण्यास सांगितलंय. महाराष्ट्रादमध्ये 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना स्वतंत्र पत्र लिहिलंय. यासंदर्भात उत्तर देखील मागितलं आहे.