Babanrao Gholap Criticized Uddhav Thackeray : ‘आता उद्धव ठाकरेंच्या सेनेला माझी गरज नाही असं माझ्या लक्षात आलं. जिथं आपली गरज आहे तिथं गेलं पाहिजे म्हणून मी आता शिंदे गटात प्रवेश करत आहे. नऊ महिन्यांपासून माझ्यावर जो अन्याय झाला त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला जितके प्रयत्न करता येतील तितके मी केले. उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला तरीही मला कुणी विचारलं नाही. मिलींद नार्वेकर, त्याचंच सगळे ऐकत आहेत. नार्वेकर बोलतात तेच सगळं ऐकलं जातं. शिवसेनेची आतापर्यंत जी काही वाताहत झाली ती नार्वेकरांमुळेच झाली आहे’, अशा जळजळीत शब्दांत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटावर प्रहार केले.
आज माजी मंत्री बबनराव घोलप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपण ठाकरेंची शिवसेना का सोडत आहोत याचा खुलासा केला. ते म्हणाले, मी आजही ठाकरेंच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोबत घेऊनच चालले आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे चाललोय दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही. नऊ महिन्यांपासून माझ्यावर जो अन्याय झाला त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला जितके प्रयत्न करता येतील तितके मी केले. उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला तरीही मला कुणी विचारलं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरेंना माझी गरज राहिलेली नाही.
देवेगौडांचं कुटुंब पक्कं राजकारणी! मुले अन् जावई लोकसभेच्या रिंगणात; भाजपशीही दोस्ती
मला शिर्डी लोकसभेसाठी तयारी करण्याचे सांगितले होते. अर्थात हे सगळं न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होतं. तेही मला मान्य होतं. पण, नंतर मला अचानक संपर्कप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आलं. मला काही सांगितलं नाही. तिथं उमेदवार दुसरा दिला. त्याला फिरायला सांगितलं. मला टाळायला लावलं ते काही मला पाहवलं नाही आणि मी माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. मला सहानुभूती मिळाली नाही त्यामुळे आज अखेर मला हा निर्णय घ्यावा लागला.
संजय राऊत यांनी मला बोलावून घेतलं माझं म्हणणं ऐकून घेतलं. पुढे काय करता येईल असंही ते म्हणाले होते. परंतु, पुढे त्यांची वकिली काही चालली नाही, असे घोलप यांनी स्पष्ट केले. या सगळ्यात कोण आडवं येतंय असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर घोलप यांनी थेट मिलींद नार्वेकर यांचं नाव घेतलं. त्याचंच सगळे ऐकत आहेत. नार्वेकर बोलतात तेच सगळं ऐकलं जातं. शिवसेनेची आतापर्यंत जी काही वाताहत झाली त्या नार्वेकरांमुळेच झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेत नार्वेकरच सगळे निर्णय घेतात.
अखेर ठरलं! कल्याण शिंदेंचचं, फडणवीसांनीच जाहीर केलं श्रीकांत शिंदेंचं नाव
या गोष्टी तुम्ही कधी उद्धव ठाकरेंना सांगण्याचा प्रयत्न केला नाही का, असे विचारले असता घोलप म्हणाले, मी ठाकरेंना अनेक वेळा मेसेज केले. त्यांना फोन केले. पण त्यांनी एकदाही माझा फोन घेतला नाही. त्यामुळे मी आता असे गृहीत धरले की माझी गरज राहिली नाही. चांगलं काम करणाऱ्या माणसांना अडथळे आणणे. मी काही देतही नाही आणि घेतही नाही त्यामुळे मी त्यांना नको होतो असा माझा अंदाज आहे. शिवसेना जी फुटली त्याला मिलींद नार्वेकर हेच जबाबदार आहेत. नार्वेकरांचं सगळं ऐकलं जातं. त्यांच्या सांगण्यावरुनच सगळे निर्णय घेतले जातात आणि निष्ठावंतांना डावललं जातं.
आता तुम्ही शिंदे गटात प्रवेश करताय पण, शिर्डीची उमेदवारी तर जाहीर झाली आहे आणि नाशिकची उमेदवारी जाहीर होणे अद्याप बाकी आहे या प्रश्नावर घोलप म्हणाले, दोन्ही निवडणुकांना अजून वेळ आहे. ज्यावेळी माझा प्रवेश होईल त्यावेळी माझ्या काय अपेक्षा आहेत त्या मी सांगेन.