पक्षासाठी निधी द्या अन्यथा… पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्री अन् आमदारांना स्पष्ट सूचना

Parth Pawar यांनी नी मंत्री आणि आमदारांना पक्षाच्या निधीसाठी रक्कम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Parth Pawar

Parth Pawar

Give funds to party Parth Pawar’s clear instructions to NCP ministers and MLAs : गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये पटेल-तटकरे आणि त्यांच्या फळीतील नेते विरूद्ध पार्थ पवार असा संघर्ष असल्याच्या अनेक गोष्टी वारंवार समोर येत आहेत. त्यात आता तर थेट पार्थ पवारांनी मंत्री आणि आमदारांना पक्षाच्या निधीसाठी रक्कम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा साधू अवतार चर्चेत!

पार्थ पवार यांनी पक्षाच्या निधीसाठी मंत्री आणि आमदारांना त्यांना अर्थमंत्री असताना अजित पवारांनी दिलेल्या निधीतून काही रक्कम पक्षनिधीसाठी देण्याचं सांगितलं आहे. पक्षाची आर्थिक ताकद वाढवणे त्याचबरोबर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पार्थ पवारांनी या सूचना दिल्याचं बोललं जात आहे. त्याचबरबरो पार्थ पवारांनी फक्त निधी देण्याच्या सूचनाच दिलेल्या नाही तर निधी न दिल्यास राजीनामे घेण्यात येतील असं देखील म्हटलं आहे.

मी उन्हात बसल्यावर सरकारला चटके बसतील, पण समाजाचं भलं होईल, मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका

दुसरीकडे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबाने निर्णायक पाऊल उचलत पक्षातील नेतृत्वाचे औपचारिक पुनर्रचनेचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची धुरा आता एका व्यक्तीकडे न ठेवता तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटना सुदृढ ठेवणे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणे आणि राजकीय स्थेर्य टिकवून ठेवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश मानला जात आहे.

पुण्यात 17 जणांच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; तीन निरीक्षकांसह 13 जणांवर निलंबनाची कारवाई

पक्षातील नव्या सत्ताकेंद्रांमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्यस्तरीय नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली असून, त्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष या दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. राज्यभर दौरे, कार्यकर्त्यांशी संवाद आणि अजित पवारांनी उभारलेला जनसंपर्काचा पाया मजबूत ठेवणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असेल.

 

Exit mobile version