Rohit Pawar News : राजकारणात येऊन चूक केलीय का? असं आमच्यासारख्या छोट्या नेत्यांना वाटतं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलीय. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर रोहित पवार भावनिक झाले आहेत. अजितदादा माझे काका आहेत त्यांच्याबाबतीत मी भावनिक असल्याचं ते म्हणाले आहेत.
अजित पवारांनी काल आमदारांच्या घेतलेल्या बैठकीनंतर टोकाची भूमिका घेत थेट राजभवन गाठत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिलाय. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे. त्यावर रोहित पवारांनी आपली भूमिका मांडताना भावनिक झाल्याचं दिसून आले आहेत.
एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी, जयंत पाटलांचा उपरोधिक टोला…
रोहित पवार म्हणाले, राज्यात सुरु असलेलं आजचं राजकारण अतिशय गलिच्छ झालयं, आमच्यासह मतदारांनाही कुठेतरी मतदान करुन चूक केलीय की काय? असं वाटत आहे. काही लोकं लोकांचे प्रश्न बाजूला सारुन खुर्चीवर कसं बसता येईल? याचाच विचार करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.
अजितदादा पर्मनंट DCM : पाचव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
काहीही घडलं तरी महाराष्ट्राच्या रक्तात लढणं हेच लिहिलंय, तोच विचार पुढे नेण्याचं काम शरद पवारांच्या माध्यमातून आम्ही करत असून पवारसाहेबांकडे पाहुन माझ्यासारखे छोटे कार्यकर्ते प्रेरणा घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
आमदार रोहित पवारांनी बंडावर भाष्य करताना भाजपवर टीकेची तोफ डागलीय. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी भाजप फोडणार असल्याचा अंदाज होता. पण राष्ट्रवादीचे आमदार दुसऱ्या पक्षात जात अशी भूमिका घेतील याचा अंदाज नसल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, अजितदादा माझे काका आहेत,त्यांच्याबाबतीत मी भावनिक असून पुढील काळात शरद पवार काय दिशा देतील त्या दिशेनूसार आमची वाटचाल असल्याचं ठामपणे आमदार पवारांनी स्पष्ट केलं आहे.