Download App

‘मी साहेबांना राजी करते 10 दिवस द्या, सुप्रियाने सांगितलं होतं’; अजितदादांनी संपूर्ण कहाणीच सांगितली

Dcm Ajit Pawar : भाजपसोबत जाण्याच्या आमच्या भूमिकेनंतर सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) शरद पवारांना राजी करण्यासाठी 10 दिवस घेतले पण मुदतीनंतर सुप्रियाने शरद पवारांना(Sharad Pawar) सांगितलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. कर्जतमध्ये आयोजित विचार मंथन शिबिर कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पडतानाची संपूर्ण कहाणीच सांगितली आहे.

Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा

अजित पवार म्हणाले, आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही 12 ते 12 जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला सर्व सांगितल्यानंतर तिनं सांगितलं की मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते. आम्ही 10 दिवस थांबलो होतो, त्यावेळी तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे असल्याचा दावा अजित पवारांनी केला.

त्यानंतर सुप्रिया सुळेंनी 10 दिवसांची मुदत संपल्यानंतर शरद पवारांना याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही थेट शरद पवारांकडे गेलो. त्यांनी सगळं ऐकलं. ते म्हणाले ठीक आहे. बघू आपण काय करायचं ते. नंतर आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला चर्चा केली. मी म्हटलं की वेळ जातोय. लवकर काय तो निर्णय घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, मध्य प्रदेशमध्ये भाजपच ? इंडिया टुडेचा एक्झिट पोल सर्वात वेगळा !

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच झाला होता. 1 मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं आता सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. 15 लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजेत, त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही. राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगत असा आरोप अजित पवारांनी केलाय.

Tags

follow us