राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, मध्य प्रदेशमध्ये भाजपच ? इंडिया टुडेचा एक्झिट पोल सर्वात वेगळा !

  • Written By: Published:
राजस्थान, छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, मध्य प्रदेशमध्ये भाजपच ? इंडिया टुडेचा एक्झिट पोल सर्वात वेगळा !

Assembly Election 2023: नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभेसाठी (Assembly Election 2023) मतदान पार पडल्यानंतर आज अनेक संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. काही संस्थांनी राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. तर काही संस्थांनी राजस्थानमध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP)काँटे की टक्कर होईल, असे म्हटले आहे. परंतु इंडिया टुडे, माय एक्सिस इंडियाचा एक्झिट (India Today My Axis India) पोल सर्वात वेगळा आहे. पाच राज्यापैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पुन्हा मागील सरकार सत्तेत येईल, असा एक्झिट पोल इंडिया टुडेचा आहे.

छत्तीसगड त्रिशंकू
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगड विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत. येथे भाजपला 36-46 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 40-50 जागा मिळतील, असे पोलमध्ये म्हटले आहे. छत्तीसगडमधील 16 हजरा 270 मतदारांचा कौल घेण्यात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार असून, भुपेश बघेल हे मुख्यमंत्री आहेत. येथे काँग्रेस पुन्हा सत्ता राखू शकते.

राजस्थानमध्ये टक्कर, पण काँग्रेस पुढे

राजस्थानमध्ये भाजपला 80-100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86-106 जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर आहे. परंतु काँग्रेसला थोडा जास्त फायदा मिळताना दिसत आहे. राजस्थानची विधानसभा दोनशे जागांची आहे. परंतु येथे काँग्रेसचा एका उमेदवाराचे निधन झाले. त्यामुळे 199 जागांसाठी मतदान झाले आहे. येथे सरकार बनविण्यासाठी 101 जागा जिंकणे गरजेचे आहे. या राज्यात 38 हजार 656 मतदारांचा कौल घेण्यात आला आहे. या राज्यात अनुसूचित जाती, जमाती आणि मुस्लिम मतदार हे काँग्रेसचे बाजूने आहेत. तर ब्राह्मण, राजपूत आणि ओबीसी मतदार हे भाजपच्या बाजूने आहेत. या व्यतिरिक्त जाट, गुर्जर समाजाचे मते हे काँग्रेस आणि भाजपमध्ये विभागली गेली आहे. या राज्यात अशोक गेहलोत हे मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती आहे. तर भाजपकडून महंत बालकनाथ हे दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे उमेदवार आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या तिसऱ्या पसंतीचे उमेदवार असल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपला प्रचंड बहुमत
मध्य प्रदेशमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहे. या राज्यात भाजपची सत्ता असून, यंदाही भाजपला 140-162 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 68 ते 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. या राज्यात भाजपने महिला केंद्रीत योजनाही जाहीर केल्या होत्या. त्यामुळे महिलांनी भाजपच्या उमेदवारांना पुरुषांच्या तुलनेत दहा टक्के मतदान केल्याचा अंदाजही एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे.

मिझोरममध्ये ZPM पक्षाची सत्ता येताना दिसत आहे. मिझोरमची विधानसभा चाळीस जागांची आहे. सत्ताधारी जोरमथंगा यांचे पक्ष मिझो नॅशनल फ्रंटला केवळ तीन ते सात जागा मिळताना दिसत आहे. तर झोरम पिपल्स् या पक्षाला 28-35 जागा मिळून हा पक्ष सत्तेत येईल. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष येथे नावालाच आहे. भाजपला 0-2 तर काँग्रेसला 2-4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

‘शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात’; पटेलांनी इतिहासाचा पाढाच वाचला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube