मुंबईः इंडिया(INDIA)आघाडीची बैठक दुसऱ्या दिवशी मुंबईत सुरू आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. आता या बैठकीत तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तेरा जणांची समिती स्थापन करताना आगामी निवडणुकीचा विचार करून प्रादेशिक समतोल राखण्यात आल्याचे दिसून येत आहे. या समितीत महाराष्ट्रातून शरद पवार, संजय राऊत या दोघांना स्थान मिळाले आहे.
‘इंडिया’ च्या ग्रँड फोटोशुटमध्ये सिब्बलांची अचानक एन्ट्री; काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी
या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आपचे खासदार राघव चड्ढा, जावेद अली खान, डी राजा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, लाल्लन सिंह, ओमर अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती या तेरा जणांचा समावेश आहे.
Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव करू’; धंगेकरांचं खुलं आव्हान…
इंडिया आघाडीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. त्यात जागा वाटप कशा करायच्या, या जागा वाटपाचे सूत्र काय ठरवायचे आहे. याबाबत चर्चा सुरू होणार आहे. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या आघाडीतील सर्वच पक्षाट्या नेत्यांना एकत्रीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे शक्य आहे. तेथे सर्वांच पक्षाने एकत्र मिळवून लोकसभा निवडणूक लढविली पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला आहे.