‘इंडिया’ च्या ग्रँड फोटोशुटमध्ये सिब्बलांची अचानक एन्ट्री; काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी

  • Written By: Published:
‘इंडिया’ च्या ग्रँड फोटोशुटमध्ये सिब्बलांची अचानक एन्ट्री; काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी

मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांमध्ये कोणत्या कारणामुळे रुसवे फुगवे सुरू होतील याचा काहीच नेम नाही. आज (दि.1) बैठकीपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांचे हॉटेलमध्ये ग्रँड फोटोशुट झाले. मात्र, हेच फोटोशुट काँग्रेस नेत्यांच्या नाराजी नाट्याला कारणीभूत ठरले. (Kapil Sibal IN India Alliance Photoshoot)

Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव करू’; धंगेकरांचं खुलं आव्हान…

त्याचे झाले असे की, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचा आजच दुसरा दिवस आहे. आजच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सकाळी बैठकीला सुरूवात होण्यापूर्वी सर्व प्रमुख नेत्यांचे एकत्रित फोटो शुट झाले. यावेळी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम करत समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी अचानक एन्ट्री झाली.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

आता सिब्बल येऊन नुसते येऊन बसले असते तर वेगळी गोष्ट होती. पण इंडिया आघाडीच्या बैठकीला त्यांना अधिकृत आमंत्रण नसतानाही सिब्बलांनी हजेरी लावली आणि अन्य नेत्यांच्या एकत्रित फोटो सेशनमध्येही सहभाग नोंदवला. त्यामुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरेंकडे व्यक्त करण्यात आली खंत

दरम्यान, सिब्बल यांच्या अचानक एन्ट्रीने नाराज झालेल्या काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर तात्काळ खंत बोलून दाखवल्याचे सांगितले जात आहे. फोटो क्लिक करण्यापूर्वी वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. मात्र, फारुख अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी वेणुगोपाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर, राहुल गांधी यांनीही आपल्याला कोणावरही आक्षेप नसल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर कपिल सिब्बल यांनाही ग्रँड फोटोशुटमध्ये सहभागी करून घेत त्यांचे इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत स्वागत करण्यात आले.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

काँग्रेस नेत्यांची सिबल्लांवर नाराजी का?

सिब्बल यांनी मे 2022 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाला रामराम करण्यापूर्वी काँग्रेसमधील G23 च्या काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच याबाबत सोनिया गांधींना पत्रदेखील लिहिलो होते. हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये सिब्बल यांचादेखील सहभाग होता. पत्रात सिब्बल यांनी थेट राहुल गांधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ माजली होती. पक्षात असताना सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये गांधी घराण्याऐवजी सामूहिक नेतृत्त्व असावे, असे मत अनेकदा बोलून दाखवले आहे.

INDIA Alliance Meeting : …म्हणून इंडियाच्या बैठकीला आलेले राहुल गांधी झाले हॉटेलमधून अचानक गायब

आजच्या बैठकीला दिग्गज नेत्यांची हजेरी

इंडिया आघआडीच्या आजच्या बैठकीला प्रमुख पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसचे अध्यक्ष मलिकाजुर्न खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव, एमके स्टॅलिन यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, सीताराम येचुरी, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube