Download App

एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी, जयंत पाटलांचा उपरोधिक टोला…

आता एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी आलीय, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फुट पाडत आपल्या सहकाऱ्यांसमवेत मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती होताच नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष…

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, काही दिवसांपासून एकनाथ शिंदे चांगलेच चर्चेत होते. शिंदे प्रचंड जोरात होते, एवढे की ठाण्यातही कोणाला भेटत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदेंविषयी लोकांमध्ये प्रचंड राग असेल, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

ही ‘गुगली’ नाहीतर दरोडाच, अजित पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचा घणाघात

तसेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी बंड केलं तेव्हा सांगितलं होतं की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीमुळेच आमच्यावर अन्याय झाला होता. त्यामुळेच आम्ही भाजपशी युती करत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केल्याचं पाटलांनी सांगितलं.

Buldhana : भीषण अपघाताचे कनेक्शन यवतमाळच्या पोलीस उपनिरीक्षकापर्यंत; काय आहे प्रकरण?

याच दाव्याची आठवण करुन देत आता राष्ट्रवादीचेच अजित पवार तिकडे आल्याने एकनाथ शिंदे यांना परत जाण्याची एक संधीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आमचं अजित पवारांच्या कृतीला पाठिंबा नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे.

पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने आणि विधानसभेच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने मी आपणाला ठामपणे सांगतो की, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे सर्व कार्यकर्ते तर फार मोठ्या संख्येने झालेल्या घटनेतून व्यथित झाले असून यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर देत असल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us