ही ‘गुगली’ नाहीतर दरोडाच, अजित पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचा घणाघात

ही ‘गुगली’ नाहीतर दरोडाच, अजित पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचा घणाघात

आजची ही छोटी गोष्टी नाहीये, गुगली नाहीतर हा दरोडाच असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत नाराज असलेले अजित पवार अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. अजित पवारांनी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत इतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी घणाघात केलाय.

‘त्या’ सहकाऱ्यांची भूमिका दोन दिवसांत समोर येईल, बंडानंतर शरद पवारांचं मोठं विधान…

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेतलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिमंडळातही घेतलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आरोप वास्तविक नव्हते. त्यांनी आरोपांमधून राष्ट्रवादीला मुक्त केलं, त्याबद्दल मी मोदींचे आभार मानत असल्याचा खोचक टोलाही लगावला आहे.

शिंदे गटाचा प्रस्ताव गेला, भाजपाच्या मंत्र्यांची वाढली धाकधूक; राणे-दानवेंची खुर्ची धोक्यात?

तसेच सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यास आम्ही जनतेत उतरणार असून आज जे काही घडलंय, त्याची मला चिंता नाही. आमची खरी शक्ती सामान्य माणून आणि कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला मी असं कधीही म्हणणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप MLA च्या मुलाने केलं दोन लेकरांच्या आईशी लग्न, आता जीवे मारण्याची धमकी; महिलेचे गंभीर आरोप

दरम्यान, हे घडल्यानंतर मला देशभरातील नेत्यांचे फोन आले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सहकारी माझ्या संपर्कात असून त्यांची भूमिका दोन ते तीन दिवसांत भूमिका स्पष्ट होणार आहे. ज्यावेळी 56 पैकी 50 गेले तरीही आम्ही वेगळेच राहिलो आणि आता बाकीचे गेले आहेत तेव्हाही आम्ही वेगळेच आहोत, आम्हाला फक्त त्यांच्या भविष्याची चिंता असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणा महाभूकंप घडला आहे. अजित पवारांनी आपल्या 9 सहकाऱ्यांनासोबत नेत राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर अखेर शरद पवारांनी मौन सोडलं आहे. शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर आता अजित पवारांसह सोबत गेलेले सदस्य काय भूमिका मांडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube