भाजप MLA च्या मुलाने केलं दोन लेकरांच्या आईशी लग्न, आता जीवे मारण्याची धमकी; महिलेचे गंभीर आरोप

भाजप MLA च्या मुलाने केलं दोन लेकरांच्या आईशी लग्न, आता जीवे मारण्याची धमकी; महिलेचे गंभीर आरोप

उत्तर प्रदेशातील आग्रााचे BJP आमदार छोटे लाल वर्मा (Chhote Lal Verma) यांचा मुलगा लक्ष्मीकांत वर्मा (Laxmikant Verma) याच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आता एका महिलेने लक्ष्मीकांत विरोधात आणखी एक एफआयआर (FIR) दाखल केला आहे. लक्ष्मीकांत एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून आपण तसे करण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे. (agra case filed against mla chhote lal verma son for the second time woman made serious allegations)

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, लक्ष्मीकांत वर्मा याचे आधीच लग्न झाले होते. असं असतानाही त्याने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मंदिरात दुसरे लग्न केले. महिलेला ताजगंजमध्ये घरही मिळवून दिले. मात्र लग्नानंतर लक्ष्मीकांत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करू लागला. त्यामुळे २०२२ मध्ये महिलेने लक्ष्मीकांतवर गुन्हा दाखल केला.

Samrudhi Highway Accident : जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो; पवारांची बोचरी टीका 

लक्ष्मीकांतच्या विरोधात तक्रार दाखल करताच तो महिलेवर एफआयआर मागे घेण्यास दवाब टाकू लागला. तू तक्रार मागे घेतली नाहीतर मी तुला आणि तुझ्या दोनही मुलांना मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. तेव्हापासून महिलेला सतत धमक्या देत होता. लक्ष्मीकांत रिव्हॉल्व्हर घेऊन कायम तिचा पाठलाग करायचा असा आरोप पीडितेने केला आहे.

वाटेत अडवून द्यायचा धमक्या
महिलेच्या म्हणण्यानुसार, आमदाराचा मुलगा लक्ष्मीकांतकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. त्याला दारू पिण्याचंही व्यसन आहे. त्याने अनेकवेळा आपला पाठलाग केला आहे. आपण वाटेत त्याला दिसताच तो अडवून धमकी द्यायचा. पीडितेने सांगितले की, ती तिच्या दोन मुलांसह घरात एकटीच राहत असून लक्ष्मीकांतच्या भीतीमुळे ती कुठेही बाहेर पडू शकली नाही.

दरम्यान, पोलिसांनी 40 वर्षीय लक्ष्मीकांत विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीकांतवर महिलेचा पाठलाग करून तिला धमकी देण्याच्या उद्देशाने आणि जुन्या प्रकरणात खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

एसीपी अर्चना सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, “महिलेने यापूर्वी आरोपी व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू आहे. पुराव्याच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाईल.”

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube