Download App

Jharkhand Assembly Election 2024 : भाजपची यादी जाहीर, निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ फिक्स

Jharkhand Assembly Election 2024 : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीच्या

  • Written By: Last Updated:

Jharkhand Assembly Election 2024 : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Election 2024) पहिल्या टप्प्यासाठी भाजपने (BJP) स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह 40 नावांचा समावेश आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, हिमंता बिस्वा सरमा, बाबू लाल मरांडी, अमर कुमार बौरी, लक्ष्मीकांत बाजपेयी, रवींद्र कुमार राय, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, मोहन यादव, स्मृती इराणी आणि नायब सिंग सैनी झारखंड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपचा प्रचार करताना दिसणार आहे.

तसेच या यादीमध्ये दिग्गजांच्या व्यतिरिक्त मोहन चरण माझी, विष्णू देव साई, अर्जुन मुंडा, नित्यानंद राय, केशव प्रसाद मौर्य, सम्राट चौधरी, अन्नपूर्णा देवी, संजय सेठ, नागेंद्र नाथ त्रिपाठी, कर्मवीर सिंग, चंपाई सोरेन, करिया मुंडा, दीपक यांचा समावेश आहे. प्रकाश, विद्युत बरन महतो, निशिकांत दुबे, धुल्लू मेहतो, सुवेंदू अधिकारी, आदित्य साहू, प्रदीप वर्मा, बालमुंकुंद सहाय, सीता सोरेन, रामचंद्र चंद्रवंशी, मनोज सिंह आणि घुरण राम यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

संजय राऊतांना मोठा दिलासा, मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती

झारखंड विधानसभा निवडणुक दोन टप्प्यात पार पडणार आहे. तर मत मोजणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबरोबर म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

धनंजय गाडे कर्डिले गटात! फरक पडणार नाही, प्राजक्ता तनपुरेंनी स्पष्टच सांगितले

follow us