धनंजय गाडे कर्डिले गटात! फरक पडणार नाही, प्राजक्त तनपुरेंनी स्पष्टच सांगितले

  • Written By: Published:
धनंजय गाडे कर्डिले गटात! फरक पडणार नाही, प्राजक्त तनपुरेंनी स्पष्टच सांगितले

Prajakt Tanpure : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुतीकडून (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) सध्या उमेदवार जाहीर करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा (Rahuri Assembly) मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राहुरी मतदारसंघात पुन्हा एकदा कर्डीले आणि तनपुरे यांच्यात सामना रंगणार आहे.  राहुरी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे पुन्हा एकदा बाजी मारणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

यातच निवडणुकीपूर्वी राहुरी शेतकरी मंडळाचे धनंजय गाडे (Dhananjaya Gade) कर्डिले गटात प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र आता धनंजय गाडे कर्डिले गटात गेले असले तरी कार्यकर्ते आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, आमदारकीच्या पाच वर्षात कधीही शेतकरी मंडळावर अन्याय केला नाही मात्र गाडे यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय धक्कादायक आहे असं प्राजक्त तनपुरे म्हणाले. तसेच धनंजय गाडे व्यक्तिगत अडचणीमुळे तिकडे गेला आहे मात्र तो तिकडे जास्त दिवस रमणार नाही आणि परत माघारी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गाडे यांच्या पक्ष प्रवेश केला असला तरी कार्यकर्ते आमच्यासोबत आहे आणि मी कार्यकर्तेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं देखील यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले.

राहुरी तालुका शेतकरी मंडळाचे स्वर्गीय अध्यक्ष शिवाजीराव गाडे यांचे पुत्र धनंजय गाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यलयात बैठक घेत प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी प्राजक्त तनपुरे बोलत होते.

संजय राऊतांना मोठा दिलासा, मानहानी प्रकरणात शिक्षेला स्थगिती

अडचणीच्या काळात जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे त्यांच्यासाठी भविष्यात मी उभं राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि तेव्हा शेतकरी मंडळाच्या कार्यकर्तांना उभारी देऊ असं देखील प्राजक्त तनपुरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube