NCP Political Crises : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. एकीकडे अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. तर दुसरीकडे वायबी सेंटरवर शरद पवारांची बैठक सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ( Jitendra Awhad Criticize Ajit Pawar Group in NCP Political Crises)
अजित पवारांना मोठा धक्का; उजवा हात समजल्या जाणाऱ्या अशोक पवारांनी सोडली साथ
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, तुम्हाला निवडून येताना शरद पवार लागतात. आता अचानक त्यांना सोडून जाता. तुम्हाला भाजपसोबतच जायचं तर पुरोगामी साहेबांचा चेहरा कशाला वापरता? स्वतः चे चेहरे वापरा. या लोकांसाठी आजारी असताना तोंडातून रक्त गलत असताना भर उन्हात साहेबांनी सभा घेतल्या. त्या बापाला दुःख देता वरून त्यांनाच गुरू म्हणता. त्यांना जखमी करता मात्र जखमी शेर जास्त वार करतो. तसेच जे आमदार साहेबांबरोबर राहतील ते वाचतील आणि जे त्यांना सोडून जातील घरी जातील.
प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!
पुढे आव्हाड म्हणाले की, 25 वर्ष भुजबळांसारख्यांना मंत्री केलं. ते वयाच्या 84 व्या वर्षी पर्यंत तुमच्यासाटी कष्ट घेतले. त्यांच्या विरोधात भाषण करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. अशी टीका करताना आव्हाडांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायाला मिळालं. पुढे आव्हाड म्हणाले की, हे सगळे पांडव आणि अर्जुन आहेत. आमच्यासोबत कृष्ण आहे. आम्ही लढाई जिंकणार.
6 तारखेला बैठक होणार होती. मात्र या लोकांनी पवारांना अंधारात ठेवून शपथविधी घेतला. तसेच आता साहेब या सगळ्यांचे वतनं खलसा करायला नाशिकपासून सुरूवात करत आहेत पाहु त्यांना कोण अडवतं? फोटो वापरू नका सांगितलं तरीही तुमचा माल विकण्यासाठी साहेबांचा फोटो वापरत आहेत. अशी टीका यावेळी आव्हाडांनी अजित पवार गटावर केली आहे.