प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत. आता त्या पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्येच होतील अशी चिन्ह दिसतायत. या वर्षी लोकसभा (loksabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) वेळापत्रक पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local-Self-Government Election) यावर्षी होणे जवळपास अशक्य आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी ही चार मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचा होतील. या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वेळ मिळू शकणार नाही. तसेच लगेच दोन्ही निवडणुकाही मनुष्यबळ, इव्हीएम मशीनची उपलब्ध बघता येणार नाही.
राज्यात 2019-20 पासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाद पेटला आहे. मुंबई वगळता ओबीसी जागांचा वाद आहे. तर मुंबईत महापालिकेचे वॉर्ड रचनाबाबत वाद सुरू आहे. राज्यातील 27 जिल्हा परिषदा , 250 पंचायत समित्या , तीनशे नगरपालिका आणि मुंबईसह 25 महानगरपालिका यांच्या निवडणुका होणे बाकी आहे. या ठिकाणी प्रशासक काम पाहत आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास 22 हजार नगरसेवक सदस्य ( लोकप्रतिनिधी) पद रिक्त आहेत.
CM Shinde : सुरक्षेचे कडे तोडून अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांकडे धावल्या ! हक्काची मागणी करत घातला गोंधळ
सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय चार मार्चपर्यंत पुढे ढकलल्याने हा निकाल मार्चमध्ये होईल का ? अशी याबाबत संशकता आहे. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकाची सुरवात होणे अपेक्षित आहे. ही निवडणून मे महिन्यापर्यंत संपेल. त्यामुळे या काळात कुठल्याही निवडणुका होणार नाही हे स्पष्ट आहे. मे महिन्यात न्यायालयीन सुटी असल्याने जून महिन्यापर्यंत कामकाज बंद असेल. याचवेळी विधिमंडळाचे बजेट अधिवेशन असेल. त्यांनतर जरी निर्णय आला तरी जून ते सप्टेंबर या महिन्यात पावसाळा असल्याने राज्यात कुठल्याही निवडणुका होत नाही.
‘माझा नवरा वाघ…मी वाघाची वाघीण’; मारेकऱ्यांना शरद मोहोळच्या पत्नीचा इशारा…
सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होईल. याकाळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपेक्षित नाही. नोव्हेंबर महिन्यात सण आणि दिवाळी काळात असलेला कायदा सुव्यवस्था ताण यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित नाही. डिसेंबरमध्ये नवीन सरकार आल्यानंतरच निवडणूकविषयी हालचाली सुरू होतील. या हालचाली सुरू झाल्यातरी सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिना उजाडू शकतो हे नक्की आहे. त्यामुळे आता सर्वोच्च नयायालयाने याबाबत निर्णय पुढे ढकलल्याने आता या निवडणुका देखील आता पुढे जातील. एवढेच नव्हे तर त्या 2025 या वर्षापर्यंत पुढे ढकलल्या जातील हे नक्की .