CM Shinde : सुरक्षेचे कडे तोडून अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांकडे धावल्या ! हक्कांसाठी फोडला टाहो

CM Shinde : सुरक्षेचे कडे तोडून अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांकडे धावल्या ! हक्कांसाठी फोडला टाहो

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) आज (8 जानेवारी) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्यासमोर गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भेटीची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिंदे यांना भेटण्यासाठी मज्जाव केला. त्यावेळी सुरक्षेचे कडे तोडून एक महिला मुख्यमंत्री यांच्या समोर गेली. त्यावेळी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं होतं.

LetsUpp Special: सुषमा अंधारेंनी माझ्याविरोधात कट केलाय; मुरलीधर जाधवांचा गंभीर आरोप

दरम्यान विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप (Anganwadi workers strike) पुकारला आहे. अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संपावर गेल्या आहे. त्यावरून राज्यातील शिंदे सरकारवर विरोधकांकडून टीका देखील केली जात आहे.

पोलिस महिलेच्या तक्रारीकडं सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष! महिलेने वडेट्टीवारांचं दार ठोठावलं…

गेल्या चार दिवसांपूर्वीच मुंबईतील आझाद मैदानावरील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर सडकून टीका केली. गद्दारी करून आमचं सरकार पाडलं, या खोके सरकारकडे सरकारं पाडायला पैस आहेत, जाहिरातींसाठी पैसे आहेत, पण अंगणावाडी सेविकांना मानधन द्यायला पैसे नाहीत. असं ठाकरे म्हणाले होते.

जाणून घ्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या?

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजक वेतनवाढ, दरमहा पेन्शन याविविध मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका बेमूदत संपावर गेल्या आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube