पोलिस महिलेच्या तक्रारीकडं सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष! महिलेने वडेट्टीवारांचं दार ठोठावलं…

पोलिस महिलेच्या तक्रारीकडं सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष! महिलेने वडेट्टीवारांचं दार ठोठावलं…

vijay wadettivar : राज्यात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिस महिलेवर बलात्काराची घटना ताजी आहे. अशातच आता नायगाव पोलिस कार्यालयात महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने या पोलिस कर्मचाऱ्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं दार ठोठावलं आहे. (vijay wadettivar) यासंदर्भात वडेट्टीवारांनी ट्विटद्वारे पोस्ट शेअर करीत संताप व्यक्त केला आहे.

सशस्त्र पोलिस नायगाव पोलिस उपायुक्त कार्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपाईवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तक्रार माझ्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. अश्लील शेरेबाजी होणे, कार्यालयात काम करत असतानाचा व्हिडिओ बनवणे, अश्लील हावभाव करून अत्याचार झाल्याची तक्रार सदर महिलेने केली आहे. झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत वरिष्ठांकडे सबंधित पोलिसाची तक्रार केली मात्र, त्यावर कारवाई होण्याऐवजी सदर महिलेला मानसिक त्रास देण्यात आल्याची माहिती सुद्धा तक्रारीत देण्यात आली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

अवघ्या काही तासांत ठरणार राज्याच्या राजकारणाचं भविष्य; 10 जानेवारीला नार्वेकरांचा निकाल

तसेच राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणात महिला पोलिस आणि महिला कर्मचारी कार्यरत आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ह्याचा अंदाज न लावलेला बरा.पोलिस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असून नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

तसेच पोलिस दलातील महिल पोलिसांना सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय हक्कासाठी लढा देण्याची मागणी होत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलिस विभाग आतून किती पोखरला गेला आहे हे स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले आहेत. पोलिस दलात महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने आता तरी सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून महिलेला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात नूकतीच मुंबई पोलीस दलातील परिवहन विभागातील आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, यावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले असून दावा असा प्रकार घडला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube