Download App

स्ट्राँग रूम म्हणजे काय? कशी होते मतमोजणी, एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही…

Lok Sabha Election 2024 : देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. भारतीय निवडणूक

Image Credit: letsupp

Lok Sabha Election 2024 : देशात 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यात मतदान झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मतपत्रिका मोजल्या जाणार असून त्यानंतर ईव्हीएममधील (EVM) मतमोजणी होणार आहे.

मतदानानंतर निकालाच्या दिवसापर्यंत ईव्हीएम निवडणूक आयोगाद्वारे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात. मात्र स्ट्राँग रूम म्हणजे काय? आणि या स्ट्राँग रूमचे कुलूप कोण उघडते याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नाही ना तर या लेखात जाणून घ्या या महत्वाच्या प्रश्नाची सर्व उत्तरे.

स्ट्राँग रूम म्हणजे काय?

मतदानानंतर ज्या रूममध्ये ईव्हीएम ठेवल्या जातात त्या रूमला स्ट्राँग रूम म्हणतात. जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये निवडणूक आयोगाद्वारे स्ट्राँग रूम तयार करण्यात येतात आणि हा कक्ष पूर्णपणे कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतो.

स्ट्राँग रूमचे कुलूप कोण उघडते?

निकालाच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास  स्ट्राँग रूमचे कुलूप उघडले जाते. यावेळी तिथे निवडणूक अधिकारी आणि आयोगाचे निरीक्षकही उपस्थित राहतात. स्ट्राँग रूमचे कुलूप उघडण्याची संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफीकरण्यात येते. तसेच यावेळी प्रत्येक उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित असतो आणि ईव्हीएमचे कंट्रोल युनिट मतमोजणी टेबलावर ठेवले जातात. यानंतर प्रत्येक कंट्रोल युनिटचा युनिक आयडी आणि सील जुळवून पोलिंग एजंटला दाखवला जातो. कोणत्याही उमेदवाराच्या एजंटचा आक्षेप नसेल, तर प्रक्रिया सुरू होते.

मतमोजणी केंद्रावर किती लोक राहतात ?

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,मतमोजणी ठिकाणाच्या प्रत्येक हॉलमधील टेबलावर उमेदवाराच्या वतीने एजंट उपस्थित असतो आणि एका हॉलमध्ये 15 पेक्षा जास्त एजंट उपस्थित राहू शकत नाही. उमेदवाराच्या वतीने एजंटची निवड केली जाते आणि त्याचे नाव, फोटो आणि इतर माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना शेअर केली जाते.

मतमोजणी केंद्रात कोण जाऊ शकते?

माहितीनुसार, मतमोजणी केंद्रात फक्त मत मोजणी करणारे कर्मचारी, रिटर्निंग अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि उमेदवाराच्या वतीने एजंट यांना प्रवेश देण्यात येतो. जेव्हा पर्यंत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तेव्हा पर्यंत एजंटला बाहेर जाता येत नाही तसेच मतमोजणी केंद्रात कोणालाही मोबाईल नेण्याची परवानगी नसते. याच बरोबर मतदानादरम्यान कोणत्याही एजंटला गैरप्रकार झाल्याचा संशय असल्यास तो फेरमोजणीची मागणी करू शकतो.

ओवेसींचा खेळ बिघडणार, माधवी लता ठरणार जायंट किलर?

मतमोजणीनंतर ईव्हीएमचे काय होते?

मत मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये 45 दिवसांसाठी ठेवल्या जातात. 45 दिवसानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले जाते.

follow us

वेब स्टोरीज