ओवेसींचा खेळ बिघडणार, माधवी लता ठरणार जायंट किलर?

ओवेसींचा खेळ बिघडणार, माधवी लता ठरणार जायंट किलर?

Hyderabad Lok Sabha Result 2024 :  देशात 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Result 2024) जाहीर होणार आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी भाजपला धक्का देत सरकार बनवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे तेलंगणातील हैदराबाद लोकसभा (Hyderabad Lok Sabha) जागेवर पुन्हा विद्यमान खासदार आणि एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) निवडून येणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष रहाणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे यावेळी भाजपने (BJP) मोठी खेळी खेळत असदुद्दीन ओवेसी यांना टक्कर देण्यासाठी माधवी लता (Madhavi Lata) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

माधवी लता यांनी प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्वाचे मुद्दे उपस्थित करत जोरदार प्रचार केला होता त्यामुळे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना यावेळी टक्कर मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. हैदराबाद लोकसभा जागेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान झाले. या लोकसभा जागेवर एकूण 1957931 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 1012522 तर महिला मतदार 945277 आहेत. 2019 मध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे उमेदवार डॉ.भगवंत राव यांचा 3 लाख मतांनी पराभव केला होता.

तर दुसरीकडे 1984 पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. 1984 मध्ये या जागेवर पहिल्यांदा असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन यांनी विजय मिळवला होता त्यानंतर ते 2004 पर्यंत ते खासदार राहिले आणि त्यांच्यानंतर आतापर्यंत असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार पद आपल्या हातात कायम ठेवले.

‘आमच्या नादाला लागू नका’, संजय राऊतांचा राणांना थेट इशारा

यामुळे यंदा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या खेळ बिघडणार की पुन्हा एकदा ते जिंकून येणार याचा निर्णय उद्या म्हणजे 4 जून रोजी होणार आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आपल्या मैदानातच विरोध, आता कुठे करणार आंदोलन?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज