नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, ‘ते’ वक्तव्य पडले महागात; गुन्हा दाखल

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, ‘ते’ वक्तव्य पडले महागात; गुन्हा दाखल

Navneet Rana : सोशल मीडियावर (Social Media) काहींना काही कारणाने चर्चेत राहणारे अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सायबराबाद पोलिस आयुक्तालयांतर्गत शादनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्ण मोहन यांनी खासदार नवनीत राणाविरोधात तक्रार दाखल केली होती.

एका जाहीर सभेत बोलताना ‘तुम्ही जर राहुल गांधीना मत दिल्यास तुमचे मत पाकिस्तानला जाईल’ असं नवनीत राणा म्हणाले होते. याची दखल घेत निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्ण मोहन यांनी नवनीत राणाविरोधात तक्रार दाखल केली होती.

हैदराबाद लोकसभा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि एमआयएमवर हल्ला करत नवनीत राणा म्हणाले होते, जर लोकांनी एआयएमआयएम आणि काँग्रेसला मत दिले तर ते थेट पाकिस्तानात जाईल.

महाराष्ट्र हादरला! भर दिवसा उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या

राहुलप्रेम ज्या प्रकारचे पाकिस्तान दाखवत आहे त्यावरून त्यांना राहुल गांधींना जिंकायचे आहे आणि मोदींना हरवायचे आहे. काँग्रेस पाकिस्तानच्या इशाऱ्यावर देशाचे सरकार चालवणार त्यामुळेच आता पाकिस्तानत्यांच्यावर आपला प्रेम दाखवत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube