महाराष्ट्र हादरला! भर दिवसा उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्र हादरला! भर दिवसा उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या

Bhushan Lahamage Murder : नाशिकजवळ (Nashik) उत्तर महाराष्ट्र केसरीची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक- मुंबई महामार्गावर (Nashik -Mumbai Highway) करिश्मा ढाब्याजवळ उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामागेची (Bhushan Lahamage) हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला. सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामागेची पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी भूषण लहामागेचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

भारतीय संघात होणार मोठा बदल? बीबीसीआय ‘या’ पदासाठी मागविणार अर्ज

नाशिक- मुंबई महामार्गावर भर दिवसाही धक्कादायक घटना घडल्याने नाशिक- मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही धक्कादायक घटना घडल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube