अहमदनगर लोकसभा मतमोजणी ते फेऱ्या कसं असेल नियोजन? जिल्हाधिकारी काय म्हणाले?

अहमदनगर लोकसभा मतमोजणी ते फेऱ्या कसं असेल नियोजन? जिल्हाधिकारी काय म्हणाले?

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. ही मतमोजणी नगर शहरातील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र वखार महामंडळ येथे होणार आहे. (Ahmednagar Lok Sabha) दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी अनुक्रमे 450 आणि 415 इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ वाजता पोस्टल मतमोजणी सुरुवात होणार असून, त्यानंतर अर्ध्या तासांनी ईव्हीएम मशीनच्या काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही Lok Sabha Election 2024 Result : सर्वात जलद निकाल, पहा फक्त लेट्सअप मराठीवर

या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन स्तरावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलीस,  सी. आर.पी.एफ व सीपीएफ असे तीन स्तरावरती पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाता येणार नाही. असंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल आहे.

किती फेऱ्या होणार

नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यावरती बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की आपल्या येथे कमीत कमी नगर शहरामध्ये 21 फेऱ्या ते जास्तीत जास्त 27 फेऱ्या पार पडतात. दोन मतदारसंघांमध्ये 365 मतदान केंद्र आहेत साधारण एका राऊंडला आपण अर्धा तास जरी पकडला रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कटरीना आपल्याला दुपारपर्यंत समजू शकतो असे देखील यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज