Election Commission issued Notice to Chief Minister Office : महायुतीच्या जागावाटपात भाजपाच्या दबावामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी या नाराज नेत्यांची बैठकही झाली होती. आता हीच बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बैठकीबद्दल निवडणूक आयोगाकडे काँग्रेसच्याावतीने तक्रार (Election Commission) करण्यात आली होती. निवडणूक आयोगानेही या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. या प्रकाराचा त्वरीत खुलासा करावा अशा सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी उत्तर मिळाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘मित्रपक्षांसाठी हक्काच्या जागा सोडू नका’ शिंदेंच्या मंत्री अन् आमदारांचा नाराजीचा सूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आचारसंहितेचा भंग झाला म्हणून कारवाई करा अशी मागणीही या तक्रारीद्वारे करण्यात आली होती. यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत नोटीस बजावली आहे.
महायुतीतील जागावाटपात शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आली. त्यामुळे या नेत्यांत कमालीची नाराजी होती. अशा वेळी या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. वर्षा सरकारी बंगल्यावर बैठकही पार पडली. याच बैठकीविरोधात काँग्रेस नेते सावंत यांनी तक्रार दाखल करत हा आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा केला होता.
Eknath Shinde : जागा वाटप योग्य पद्धतीने होईल, शिवतारेंना युती धर्म पाळावाच लागणार!
यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी यांना नोटीसा बजावल्या आहेत. आता या नोटीसीला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यांचे उत्तर मिळाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडीणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांन दिली.