Maharashtra Assembly Session : विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी (Maharashtra Assembly Session) सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला. आधी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. विरोधी पक्षांनी मात्र या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे आज विधिमंडळात सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधकांवर तुटून पडले होते. तर दुसरीकडे विधानपरिषदेतही असेच रणकंदन पाहण्यास मिळाले. येथे विरोधकांनी मात्र ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
ओबीसी आणि मराठा आरक्षणासंबंधीची बैठक सभागृहात का घेतली नाही असा सवाल विरोधी आमदारांनी उपस्थित केला त्यावर सत्ताधारी पक्षांचे आमदार आक्रमक झाले. बैठकीला उपस्थित राहिले नाहीत म्हणून सत्ताधारी आमदारांकडून जोरदार गोंधळ घालण्यात आला. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात थेट मार्शल्सनाच पाचारण केले. परंतु मार्शल काही सभागृहात आलेच नाहीत. यानंतर परिस्थिती बिघडू नये यासाठी आमदारांना ठराविक अंतरावर उभे करण्यात आले.
मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठकीवरून विधानसभेत गदारोळ; आमदार साटमांसह शेलारही आक्रमक
इतके केल्यानंतरही गोंधळ काही थांबला नाही. त्यामळे गोऱ्हे यांनी नाईलाजाने सभागृहाचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब केले. अधिवेशनाच्य दहा दिवसांत मार्शल्सना बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु, मार्शल्स काही सभागृहात आले नाहीत. त्यामुळे नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या होत्या. यानंतर त्यांनी विधानपरिषदेचे सुरक्षाप्रमुख आणि विधिमंडळ सचिवांना बोलावून घेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. काल महायुती सरकारने मराठा आणि ओबीस आरक्षणासंदर्भात एक बैठक आयोजीत केली होती. त्या बैठकीला विरोधकांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. (Maratha Reservation) त्यावरून मोठा गदारोळ आज विधानसभेत पाहायला मिळाला. (Assembly session) भाजप आमदार अमित साटम यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करत विरोधकांना मराठा समाजाचं काही देणघेण नाही. त्यांना विधानसभेच्या निवडणुकांची काळजी पडली असा आरोप करत जोरदार गदारोळ केला.
विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले, ‘सुमनताईनंतर आता रोहितला साथ द्या’