Uddhav Thackeray Speech in kalamb : उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर होते. कळंब येथे जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, होय आज मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात निकाल द्यायला लावला हा माझा आरोप आहे. उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. तो घरातील माणूस होता. आदित्य-तेजस त्यांना काका म्हणायचे. पण घरातलाच माणूस एवढा उलटा फिरू शकतो, असे ठाकरे म्हणाले.
भाजपचं हिंदुत्व बेगडी, हा सगळा कचरा साफ करणार; उद्धव ठाकरे कडाडले
कारण काल सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की तुम्ही म्हणजे त्या लवादाने जो निकाल दिला तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध वाटत नाही काय हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पण, हे एवढे निर्लज्ज आहेत भाजप काय, मिंधे काय दुसरे ते गेलेले 70 हजार कोटीवाले.. काही जणांना तर मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे तर काही जणांना त्यांच्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे.
शिवसेनाप्रमुखांनी त्यांना भरभरुन दिलं. आम्ही त्यांना भरभरुन दिलं. घरातील कुटुंबियांसारखं मी त्यांच्याशी वागलो. अगदी आदित्य काय तेजस काय त्यांना काका-काका म्हणून हाक मारत होते. आम्हाला तो एक धक्का होता की अरे आपल्या घरातला माणूस (एकनाथ शिंदे) एवढा उलटा फिरू शकतो. आणखी मी काय देऊ शकतो.
एक खरं की माझ्या मनात कधीच मुख्यमंत्रीपद नव्हतं. भाजपने आपल्याला दगा दिला. पाठीत वार केला. हो केलाच असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टीवर केला.
Sanjay Raut : राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राऊत म्हणाले, आता ती वेळ