आमदार, खासदार भाडखाऊ पण महाराष्ट्राची जनता नाही; उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका
Udhav Thackeray : आमदार, खासदार भाडखाऊ पण महाराष्ट्राची जनता नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदार आणि खासदारांवर केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्यावतीने धाराशिवमधील उमरगामध्ये जनसंवाद जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, सापाला आपण दूध पाजलं आता त्याला त्याची जागा बरोबर दाखवयाची आहे. काल परवा काही लोकं काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत ते जाऊ द्यात. आज माझ्यासोबत काँग्रेस, वंचित, मुस्लिम समाज, राष्ट्रवादी आहे. मुस्लिमांना शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वाचा फरक समजला आहे. आम्ही मैदानात लढायला उतरलो आहोत.
‘आर्टिकल 370’ समोर किरण रावच्या ‘लापता लेडीज’ची अवस्था बिकट, फक्त इतकंच कलेक्शन
ही लढाई तुमच्या भावी पिढीची आहे. सगळेच तिकडे चालले असतील तर जे कोणी राहिले असतील त्यांनी पण जावं कारण आम्ही जिंकणार आहोत उद्या गेल्यानंतर असं म्हणून नका की आम्ही सोबत नाही. आमदार, खासदार तुम्ही घेतलेत पण जनता 50 खोक्यात येऊ शकतन नाही कारण राज्याची जनता भाडखाऊ, लाचार नाही नादान नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
नऊ वर्षीय बालकावर हृदयविकाराची गंभीर शस्त्रकिया; भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशन बनले देवदूत
तसेच ‘जय श्रीराम ही घोषणा आहे आम्हीपण राम भक्त आहोत, त्यावेळी जसं सगळं उसळंल होतं त्यावेळी भाजपचं कोणीच रस्त्यावर फिरत नव्हतं. मोदींचं नाव कोणाला माहिती नव्हतं. तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो 2019 साली अडिच अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा शब्द अमित शाहांनी बाळासाहेबांच्या खोलीत दिला होता भवानीमातेच्या साक्षीने सांगतो हे खरं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.