Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Aditi Tatkare) फक्त महिलांसाठी आहे. मात्र या योजनेत तब्बल 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर अशा पद्धतीने पुरुषांनी लाभ घेतला असेल तर अशा बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येतील. जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर कारवाई करायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला होता. यानंतर विरोधकांनी यावरून राज्य सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेची घोषणा 28 जूनला झाली होती. अर्ज भरण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या योजनेत छाननी करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. इतर विभागाकडील डेटा महिला बालविकास विभागाला अॅक्सेस करता येत नाही त्यामुळे अडचणी येतात. ज्या महिलांकडे बँकेत खाते नव्हते म्हणून त्यांनी त्यावेळी पुरुषांचे अकाउंट नंबर दिले होते का, हाही एक प्रश्न आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर याची माहिती मिळेलच. बँकेत महिलेचे खाते नसेल तर अशावेळी पुरुषांनी अर्ज भरलेला असू शकतो. परंतु, याबाबतीत तपासणी केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही.
काय सांगता! लाडकी बहीण योजनेत लाडके भाऊ, 14 हजार पुरुषांनी घेतला लाभ; वसुली होणार..
याआधी काही अपात्र महिलांनीही अर्ज केले होते तेव्हा त्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. मी याआधीही सांगितलं आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर कारवाई केली जाईल. अका व्यक्तीने 30 ते 35 खाते जोडले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ते अकाउंट सील करण्यात आले होते. योजनेत पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळणीमध्ये समोर आलंय. अडीच लाख कुटुंब उत्पन्नाची अटही बऱ्याच महिलांनी पाळली नाही. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोनच महिलांना देण्यात येतो. मात्र काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलं आहे. ही योजना 65 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांसाठी आहे, कारण 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना सरकार इतर योजनेअंतर्गत लाभ देतं. परंतु 65 पेक्षा जास्त वयाच्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकार आता पडताळणीद्वारे अशा अपात्र महिलांची नावं योजनेतून कमी करत आहे.
महत्वाची बातमी! नो चाळण, नो गाळण, लाडकी बहीण योजनेची पडताळणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय