छावा पदाधिकाऱ्याला अजित पवार गटाच्या सुरज चव्हाणकडून मारहाण; तटकरेंची प्रतिक्रिया काय?

छावा पदाधिकाऱ्याला अजित पवार गटाच्या सुरज चव्हाणकडून मारहाण; तटकरेंची प्रतिक्रिया काय?

Sunil Tatkare On Suraj Chavan : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Tatkare) यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर पत्ते आणून टाकल्याचा प्रकार घडला. या घनटेनंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारची मारहाण करणे चुकीचं असं ते म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत. यावरच तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मारहाणीत सूरज चव्हाण असतील तर ते चूक आहे. मी याचं कधीच समर्थन करणार नाही, असे तटकरे म्हणाले. तसंच, मी शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न सुटत असतात.

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, छावा संघटना अन् NCP कार्यकर्ते भिडले…

छावा संघटनेचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आले होते. मी त्यांची भावना शांततेने ऐकून घेतली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सूरज चव्हाण या माराहाणीत असतील तर ते चुकीचेच आहे. मी याचे कधीही समर्थन करणार नाही. योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मी आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. छावा पदाधिकाऱ्याला मारहाण झाली ही चूक घडली. मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो, अशी भूमिकाही तटकरे यांनी जाहीर केली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी हा गेम खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलंय. तटकरे यांनाही लातूरमध्येही अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले. ते लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांच्याजवळ येत टेबलवर पत्ते टाकले आणि कृषीमंत्र्यांना हे द्या.

विधिंडळात पत्ते खेळू नका असे सांगण्याचे आवाहन केले. यावेळी कोकाटे यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी मागणीही या पदाधिकाऱ्याने केली. या घटनेनंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत छावा संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळही केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube