Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीला पडलेलं मोठं भगदाड या सर्व गोष्टी बघितल्या आणि ऐकल्या की राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. राज्यात एकीकडे राजकीय भूकंप पाठोपाठ होत असताना मात्र, या सर्वांमागचा ‘चाणक्य’ कोण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत आहे.
पहाटेच्या शपथविधीमागे पवारांचा हात
मागील घडामोडींवर एक नजर टाकली तर, 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला तर, ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या वाटपावरून वादाची ठिणगी पडली आणि अचानक एकेदिवशी पहाटे भाजपने अजित पवारांसोबत शपथविधी पूर्ण केला. मात्र या दोघांचे सरकार अल्पावधित कोसळले. भाजप राष्ट्रवादीच्या या शपथविधीला खुद्द शरद पवारांनी पुढाकार घेत होकार दर्शवला होता असा खुलासा फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केला. त्यामुळे या शपथविधीमागचे ‘चाणक्य’ शरद पवार असल्याचे बोलले गेले.
मात्र, काल (दि.5) अजित पवारांनी त्यांच्या भाषणात अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला आणि चर्चा फिस्कटली. 2019 ला निकाल आले होते. त्यावेळी एका मोठ्या उद्योपतीच्या घरी शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि मी तर भाजपकडून त्यांचे वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस होतो. सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितले की कुठेच बोलायचे नाही. त्यामुळे आतापर्यंत बोललो नाही. मला मीडियावाले विचारतात 2019 ला काय झाले? पण मला कोणाला बदनाम होऊ द्यायचे नाही. त्यानंतर अचानक बदल झाला आणि सांगितले की आपल्याला शिवसेनेसोबत जायचे असे पवारांनी सांगितले.
जयंत पाटलांची पवारांसमोरच अमोल कोल्हेंना ऑफर, हात जोडून आपला आदेश म्हणत ऑफरही मान्य
शिंदेंच्या बंडामागे फडणवीस?
पहाटेचा शपथविधी मतदारांच्या विस्मरणात जात नाही तोच राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यातही खूप हाय व्होटेज ड्रामा झाला. या निवडणुकांमध्ये आमदारांची मॅजिक फिगरची जमावाजमव करण्यामागे फडणवीस असल्याचे आजही बोलले जाते. त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या 34 आमदारांसह आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला रवाना झाले. तब्बल दहा दिवसांच्या राजकीय ड्राम्यात संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले होते. या 10 दिवसांमध्ये फडणवीसांच्या अनेक गुप्त बैठका झाल्याचेही सांगितले जाते. बंडादरम्यान शिंदेंनी आपल्यामागे महाशक्तीचा हात असल्याचेही विधान केले होते. त्यामुळे ही महाशक्ती फडणवीस होती की मोदी शहांची होती हा प्रश्न मात्र, अद्यापही कायम आहे.
दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार
फडणवीसांना डावलण्यामागे कोण?
एकनाथ शिंदेंसोबत सर्व स्तरावरची बोलणी व्यवस्थित पूर्ण झाल्यावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस पुन्हा विराजमान होतील अशी आशा सर्वांनाच होती. मात्र, खुद्द फडणवीसांनीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे जाहीर केले. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्टपणे दिसून येत होते. सर्व चर्चा, आमदारांची गणित बसवल्यानंतरही अशाप्रकारे फडणवीसांना डावलण्यात आल्याने सर्वांना धक्का बसला होता. राज्यात फडणवीसांची वाढती ताकद लक्षात घेता पक्ष श्रेष्ठींकडूनच अशा प्रकारची खेळी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे राज्यातील काही नेत्यांचं भवितव्य फडणवीसांमुळे अस्पष्ट असल्याने त्यांच्या तक्रारींची दखल घेत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचीदेखील चर्चा आजही दबक्या आवाजात सुरू आहे.
मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र
अजितदादांच्या बंडामागे चाणक्य नव्हे तर, खदखद
वरील सर्व घडामोडींनंतर राज्यात कुठे आता स्थिर सरकार अस्तित्त्वात आल्याचे वाटत असतानाच रविवारी (दि.2) दुपारी अचानक अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्ष चिन्ह आणि नावावर अजितदादांनी दावा ठोकला. त्यानंतर अजित पवारांनी एमईटी इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या भाषणात संपूर्ण खदखद बोलून दाखवली. एवढेच नव्हे तर, आता पवारांचे वय झाले आता तरी ते थांबणार आहेत की नाही? असा थेट प्रश्न विचारला. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडण्यामागे एकीकडे भाजपची खेळी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजितदादांच्या भाषणातील एकूण एक मुद्दा बारकाईने ऐकल्यास या बंडामागा ना भाजपची ना पवारांची चाणक्यनिती होती तर होती ती खदखद हे मात्र अधोरेखित होते हे माात्र नक्की.