जयंत पाटलांची पवारांसमोरच अमोल कोल्हेंना ऑफर, हात जोडून आपला आदेश म्हणत ऑफरही मान्य

जयंत पाटलांची पवारांसमोरच अमोल कोल्हेंना ऑफर, हात जोडून आपला आदेश म्हणत ऑफरही मान्य

Jayant Patil On Amol Kolhe : राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे गेल्या 25 वर्षांत अनेकांनी प्रयत्न केले. शरद पवार यांनी वेळोवेळी नेत्यांना संधी दिली. पण अनेकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे, अनेकांच्या काही राजकीय निर्णयांमुळे अनेक जण सोडून गेले. ठीक आहे, शरद पवार यांच्या आजूबाजूला बसणारे नेते आज आपल्यासोबत नाहीयेत. खुर्च्या रिकाम्या झाल्यात. आता अनेकांना संधी देण्याची वेळ आली आहे, असे सांगतानाच प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांनी मोठी ऑफरच दिली.

जयंत पाटील म्हणाले, अमोल कोल्हे यांची व्हिडीओ क्लिप मी काल ऐकली. बापाला कधी विसरायंच नसतं, असं ते व्हिडीओमध्ये सांगत होते. बापाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या म्हणजे त्या कष्टाने आलेल्या असतात, याची सगळ्यांनाच जाणीव आहे. अमोल कोल्हे यांना माझी प्रदेशाध्यक्ष या नात्याने विनंती आहे, आपल्या पक्षाचं प्रचार प्रमुखपद स्वीकारा. महाराष्ट्र पिंजून काढू, शिवरायांचा विचार सांगू, पुन्हा महाराष्ट्रात आपल्या विचारांचं सरकार आणू.. अशी ऑफरच जयंतरावांनी अमोल कोल्हे यांना दिली. त्यावर अमोल कोल्हे यांनी चेहऱ्यावर स्मितहास्य आणून हात जोडून जसा आपला आदेश म्हणत त्यांची ही ऑफर मान्य असल्याचंच एकप्रकारे सांगितलं.

NCP : 32 विरुद्ध 18; आता ‘हे’ 3 आमदार ठरविणार अजित पवारांचं भवितव्य

शरद पवार यांच्या खुर्चीच्या डाव्या-उजव्या बाजूला बसणारे लोक आज त्यांच्या आजूबाजूला नाहीत. आज मला त्याची खूप मोठी खंत वाटत आहे. पण साहेबांनी एवढं सगळं दिल्यानंतरही लोक सोडून गेले, याचा रागही येतो. तिकडच्या सभेत सांगितलं की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. 2019 ला उद्धव ठाकरेंनी शपथविधीवेळी विचारलं, तुमची 2 नावं द्या. त्यावेळी पवारसाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता भुजबळसाहेबांच पाहिलं नाव सांगितलं. मग त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत का? असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube